विशेष प्रतिनिधी
संभाजीनगर : मराठवाड्यातील घनसांगवी येथे साहित्यिकांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना महाराष्ट्रातल्या साहित्यिकांनी आता वातावरण बदलण्यासाठी प्रयत्न करावे, असे जाहीर आवाहन केले आहे. उद्धव ठाकरे यांनी साहित्यिकांच्या मेळाव्यात घेतलेली भूमिका त्यांच्यासाठी नवी नसली, तरी शिवसेनेचा मात्र एक वेगळा प्रवास सांगून गेली आहे. Uddhav Thackeray takes U turn from Balasaheb Thackeray’s Hindutva approach, and turned to so called progressive writers
हीच ती शिवसेना आहे, जिच्या प्रमुखांनी एकेकाळी मराठी साहित्यिकांना बैल या शब्दाने संबोधले होते. मुंबई भरलेल्या साहित्य संमेलनाचे त्यावेळचे मुख्यमंत्री मनोहर जोशी हे स्वागताध्यक्ष होते आणि वसंत बापट हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांनी एका भाषणामध्ये मराठी साहित्यिकांची संभावना बाजारात बसलेले बैल असे केले होते. त्यावर मराठी साहित्यिकांमध्ये प्रचंड संताप उसळला होता. बाळासाहेबांचा अनेकांनी निषेध केला होता. बाळासाहेबांचा सगळा रोख हा काँग्रेसनिष्ठ आणि त्यावेळच्या पवारनिष्ठ पुरोगामी साहित्यिकांवर होता. हे सगळे साहित्यिक त्यावेळी बाळासाहेबांच्या प्रखर हिंदुत्वावर अक्षरशः तुटून पडायचे आणि बाळासाहेबही त्याची परतफेड तितक्याच प्रखर शब्दांनी करायचे.
पण त्यावेळच्या शिवसेनेत आता आणि आताच्या शिवसेनेत महदअंतर पडले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर अनेक पुरोगामी साहित्यिकांचे स्वागत केले आहे. पुरोगामी साहित्यिकांनी देखील शिवसेनेच्या हिंदुत्वावरचा टिकेचा रोख कमी करून प्रबोधनकारांचे हिंदुत्व आणि शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व असा नवा भेद तयार केला आहे आणि त्यालाच वेगळ्या प्रकारे शेंडी जानव्याचे हिंदुत्व आणि बहुजनांचे हिंदुत्व असे नाव दिले आहे.
याच पुरोगामी साहित्यिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना प्रबोधनकारांच्या साहित्याचा आणि बाळासाहेबांच्या साहित्याचा वारसा सांगितला आहे. प्रबोधनकार आणि बाळासाहेब दोन्ही परखड लिहायचे. आमच्या घरासमोर अनेकांनी मेलेली कुत्री टाकली. तरीसुद्धा प्रबोधनकार आणि शिवसेनाप्रमुख घाबरले नाहीत. त्यांनी ठामपणे आपली भूमिका मांडली याची आठवण उद्धव ठाकरे यांनी भाषणात करून दिली.
पण उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा सर्व रोख गुजरात मध्ये भाजपने मिळवलेल्या विजयावर होता. इतकेच नाही तर गुजरात मध्ये भाजप जिंकला आहे, तर आता लोकशाही संपल्याचे जाहीर करा. पण त्याचवेळी हे वातावरण बदलण्यासाठी साहित्यिकांनी पुढे येऊन आक्रमकपणे प्रयत्न केले पाहिजेत असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले आणि उद्धव ठाकरे यांचे नेमके हेच आवाहन शिवसेनेचा एक राजकीय प्रवास सांगून गेले आहे. बाजारातले बैल ते साहित्यिकांनी वातावरण बदलण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा हा बदललेला राजकीय प्रवास आहे.
Uddhav Thackeray takes U turn from Balasaheb Thackeray’s Hindutva approach, and turned to so called progressive writers
महत्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा; शिंदे – फडणवीस सरकारची २०० कोटींची मदत
- रेल्वेत नोकरीची संधी; 2500 हून अधिक पदांवर भरती; ऑनलाईन करा अर्ज
- राज्यसभेत बहुमताने समान नागरी कायदा खासगी विधेयक सादर; विरोधकांचा सूर तीव्र
- हिमाचलात काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची संगीत खुर्ची जोरात; केंद्रीय पक्ष निरीक्षक म्हणतात, इथे वाद नाही