• Download App
    महाराष्ट्रात चुंबाचुंबी मात्र तेलंगणातील कॉँग्रेसच्या कट्टर विरोधकाला मुंबईत पायघड्या, उध्दव ठाकरेंनी केला तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना फोन|Uddhav Thackeray calls on Telangana CM

    महाराष्ट्रात चुंबाचुंबी मात्र तेलंगणातील कॉँग्रेसच्या कट्टर विरोधकाला मुंबईत पायघड्या, उध्दव ठाकरेंनी केला तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना फोन

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात सत्तेसाठी कॉँग्रेस आणि शिवसेनेची चुंबाचुंबी चालू आहे. मात्र, दुसऱ्या बाजुला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कॉंग्रेसच्या तेलंगणातील कट्टर विरोधकाला पायघड्या घालत २० फेब्रुवारीला मुंबई भेटीचे निमंत्रण देत आहेत. केंद्राविरुद्ध जयप्रकाश नारायण यांच्यासारखी मोठी चळवळ उभारली गेली पाहिजे,Uddhav Thackeray calls on Telangana CM

    अशी आग्रही भूमिका त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्रक्ष के. चंद्रशेखर राव यांच्याशी चर्चा करताना केली.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपविरुद्ध आरोपांची बरसात केल्याच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी फोनवरून संपर्क साधला.



    भाजपविरोधातील लढ्यात आम्ही तुमच्यासोबत आहोत असे सांगितले. दोघांची२० फेब्रुवारीला मुंबईत भेट होणार आहे.चंद्रशेखर राव यांनी सध्या भाजपविरोधात व्यापक मोहीम छेडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडे हैदराबाद येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात ते गेले नव्हते.

    भाजप, नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राष्ट्रीय पातळीवर एक मंच उभा करण्याच्या प्रयत्नात चंद्रशेखर राव असल्याचे म्हटले जाते. त्यांना उद्धव ठाकरे यांनी आता साथ दिल्याने शिवसेना अधिक जोरकसपणे राष्ट्रीय राजकारणात उडी घेणार असल्याचे संकेतदेखील उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

    मात्र, महाराष्ट्रातील कॉँग्रेसला हे मान्य होणार का हा प्रश्न आहे. कारण चंद्रशेखर राव हे कॉँग्रेसला वगळून विरोधकांची आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. केंद्रातील भाजप सरकार हे राज्य सरकारांची मुस्कटदाबी करीत असून संघराज्य व्यवस्थेची रचनाच उद्ध्वस्त करायला निघाले आहे, अशी टीका राव यांनी केली होती.

    Uddhav Thackeray calls on Telangana CM

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??

    Indian Army पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यानंतरच भारताने सध्या थांबविले फायरिंग; भारतीय सैन्य दलांचा स्पष्ट खुलासा; शस्त्रसंधी शब्द नाही वापरला!!

    Operation sindoor : भारत – पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, पण फक्त फायरिंग थांबवल्याचा भारताचा खुलासा!!