विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या माफिया सेनेची इज्जत गेली आहे. गोवा, उत्तर प्रदेशातील जनतेने त्यांना दाखवून दिलं आहे. संजय राऊत यांच्यामार्फत स्टंट करून काहीही साध्य होत नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.Uddhav Thackeray and Mafia Sena’s last respect, Kirit Somaiya’s criticism
किरीट सोमय्या म्हणाले, नील सोमय्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारने त्यांची कुठलीही चौकशी करत नसल्याचं सांगितले. उच्च न्यायालयात ठाकरे सरकारनं स्वत:ची इज्जत घालवून घेतली. संजय राऊत यांनी नील सोमय्यांविरोधात दिलेल्या कागदपत्रांचे पुढे काय झाले? न्यायालयात ठाकरे सरकारला लोटांगण घालावे लागले.
नीलवर तुम्ही जो अत्याचार केला त्याचा हिशोब सोमय्या नक्की घेणार. राऊत तुमच्या माफिया सेनेत दम असेल तर मला हात लावून दाखवा. पुण्यात शिवसेनेनं ७७ गुंड मला मारण्यासाठी पाठवले त्यातील ३० मुंबईतले होते.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी नील सोमय्या यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते. त्या आरोपांची चौकशी मुंबई पोलीस करणार असल्याचं ते म्हणाले. इतकेच नाही तर बाप-बेटा जेलमध्ये जाणार असल्याचंही राऊतांनी दावा केला होता. या आरोपानंतर नील सोमय्यांनी अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात अर्ज सादर केला होता.
Uddhav Thackeray and Mafia Sena’s last respect, Kirit Somaiya’s criticism
महत्त्वाच्या बातम्या
- पक्ष हवालदिल, नेते सैरभैर, पळापळ झाली सुरू, कर्नाटकातील माजी केंद्रीय मंत्र्याचा कॉँग्रेसचा राजीनामा
- Kolhapur North Byelection : अपबीट मूडचा भाजप कोल्हापूर मध्ये “पंढरपूर” करणार?? शिवसेनेच्या राजेश क्षीरसागरांकडे लक्ष!!
- पीएफ रकमेवर ८.५% ऐवजी ८.१० % दराने व्याज ४० वर्षांतील सर्वात कमी दर; ६ कोटी कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी
- Son Returns from Ukraine : आईच्या लाडक्या मोदींनी परत आणले हजारो मातांचे लाल ! युद्धभूमी युक्रेनमधून परतला मुलगा – रडत रडत वडील म्हणाले आता हा मोदींजींचा मुलगा…