वृत्तसंस्था
चेन्नई : तामिळनाडूच्या निवडणूकीत डीएमकेचा फाऊल प्ले थांबायला तयार नाही. आधी ए. राजा झाले, मग दयानिधी मारन आणि आता उदयनिधी स्टॅलिन या तीनही नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये डीएमकेच्या प्रचारातली डोकेदुखी ठरताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या छळातून अरूण जेटली आणि सुषमा स्वराज या दोन मंत्र्यांचा मृत्यू झाल्याची बेछूट आरोप एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी सॅलिन यांनी केला. त्याला सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी आणि जेटली यांच्या कन्या सोनाली यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. udaynidhi stalin insults PM narendra modi, arun jaitley and sushma swaraj, both families gave befitting reply to udaynidhi maran
सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज यांनी उदयनिधी यांनी आपल्या आईच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करू नये असे ठणकावले आहे. “उदयनिधीजी कृपया माझ्या आईच्या आठवणींचा वापर तुमच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी करू नका. तुमचे वक्तव्य चुकीचे आहे. मोदींनी माझ्या आईला नेहमी आदर आणि सन्मान दिला. आमच्या कठीण काळात पंतप्रधान आणि पक्ष आमच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले. तुमच्या वक्तव्याने आम्ही दुखावलो आहोत”, असे ट्विट बांसुरी स्वराज यांनी केले आहे.
इंडिया टुडेशी बोलताना बांसुरी स्वराज यांनी प्रतिक्रिया देताना स्टॅलिन यांचे वक्तव्य अनादर करणार असल्याचं म्हटले आहे. राजकीय मुद्द्यांवर निवडणूक लढायची सोडून उदयनिधीजी माझी आई आणि अरुण जेटलींच्या नावाचा वापर करत पंतप्रधानांवर हल्ला करत आहेत याचे आश्चर्य वाटते,” असे त्या म्हणाल्या.
अरूण जेटली यांच्या कन्या सोनाली जेटली – बक्षी यांनी देखील उदयनिधी स्टॅलिन यांना खणखणीत प्रत्युत्तर दिले असून मोदी आणि अरूण जेटली यांच्यात राजकारणापलिकडची मैत्री होती. तुम्हाला ती समजायला हरकत नाही, असे स्पष्ट केले आहे. तुमच्यावर निवडणूकीचा दबाव असल्याचे मी समजू शकते. पण मी माझ्या वडिलांच्या स्मृतींचा असा अपमान मी सहन करणार नाही, असा इशारा देणारे ट्विट सोनाली जेटली यांनी केले आहे.