• Download App
    उत्तर प्रदेश एक आदर्श राज्य - योगी आदित्यनाथ | U.P. now considered as a model for india: Yogi Adityanath

    उत्तर प्रदेश एक आदर्श राज्य – योगी आदित्यनाथ

    विशेष प्रतिनिधी 

    लखनऊ: १९ सप्टेंबर ला उत्तर प्रदेश सरकारची साडेचार वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने बोलताना मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले की, राज्याच्या इतिहासातील हा एक संस्मरणीय काळ समजला जाईल. सुरक्षा आणि शासन व्यवस्था याबाबत जग आणि भारतातील लोक उत्तर प्रदेश एक आदर्श राज्य म्हणून बघत आहेत. निवडणुकांना एकच वर्ष राहिले असताना आणि आपल्या सरकारचा प्रगती अहवाल पत्रकार परिषदेत मांडतांना त्यांनी विरोधकांवर निषाणा साधला. २०१२ ते २०१७ मधील समाजवादी पक्षाच्या कारभाराबाबत बोलताना ते म्हणाले की, याआधीच्या काळात गुन्हेगारांनी भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला होता.

    U.P. now considered as a model for india: Yogi Adityanath

    उत्तर प्रदेश दंगा प्रदेश म्हणून ओळखला जात होता आणि अखिलेश यादव यांच्या काळात दर तीन-चार दिवसांनी दंगली होत असत. ते पुढे म्हणाले की,२०१७ पासून उत्तर प्रदेश मध्ये दंगल झाली नाही.  मार्च २०१७ पासून १५० संशयीत गुन्हेगार एन्काऊंटर मध्ये मारले गेले. सरकार ने जाहीर केले की ४४७५९ लोकांना गॅंगस्टर्स अॅक्ट खाली अटक केले आहे.  आरोपित माफियांकडून ₹१८८६ कोटीची माफियांची प्रॉपर्टी उद्ध्वस्त करणे व जप्ती कारवाईचा उल्लेखही केला आहे. सरकारने म्हटलं आहे की, राज्यावरील ‘बिमारू’ चा शिक्का पुसुन प्रगतीचा वेग वाढवला आहे. आदित्यनाथ म्हणाले की, सरकारने कायद्याच्या चौकटीतून गुन्हेगार व माफियांवर जात, धर्म याचा विचार न करता कारवाई केली आहे.


    Threat Call For CM Yogi Adityanath : खलिस्तान समर्थकाची CM योगी आदित्यनाथांना धमकी, 15 ऑगस्टला तिरंगा फडकावू देणार नाही !


    या पत्रिकेत सरकारने हे स्पष्ट केले की २०१९ मध्ये सीएए व एनआरसी आंदोलनात हिंसा व मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांकडून नुकसानभरपाई मिळवली आहे. तसेच बेकायदेशीर कत्तलखाने बंद केले व बेकायदेशीर धर्मांतराबाबत कायदा केला.

    सरकारने यात रामलल्लाच्या मुर्तीसह अयोध्येतील राममंदिर बांधकामाचा उल्लेख केला आहे. तसेच वाराणसीमधील काशी विश्वनाथ धाम कॉरीडॉर चा उल्लेखही आपल्या कामगिरीत केला आहे. सरकारने असा दावा केला आहे की, ४५.४४ लाख उस शेतकऱ्यांना १.४४ लाख कोटी रुपये वाटप केले आहे. राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण १७.५ टक्के वरून ४.१ टक्के इतके झाले आहे.

    U.P. now considered as a model for india: Yogi Adityanath

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!