• Download App
    घराणेशाहीचा भ्रष्टाचार मोडणारच; केंद्रीय तपास संस्थांच्या कारवाईचे पंतप्रधान मोदींकडून समर्थन!! U. P. Elections Modi speech bjp office

    UP Elections Modi : घराणेशाहीचा भ्रष्टाचार मोडणारच; केंद्रीय तपास संस्थांच्या कारवाईचे पंतप्रधान मोदींकडून समर्थन!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवल्यानंतर नवी दिल्लीत भाजप मुख्यालयात झालेल्या विजयी मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रादेशिक पक्षांची घराणेशाही आणि भ्रष्टाचार यावर प्रखर हल्लाबोल केला. त्याच वेळी त्यांनी केंद्रीय तपास संस्थांच्या कारवाईचे जोरदार समर्थन केले. U. P. Elections Modi speech bjp office

    पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की या देशातले अनेक राजकीय विद्वान उत्तर प्रदेशासारख्या राज्याला कायम जातिवादाच्या चष्म्यातून पाहत होते. जातिवादाच्या पलिकडे त्यांचे विश्लेषण जात नव्हते. पण आता उत्तर प्रदेशातल्या जनतेने विशेषत: या महिलांनी आणि तरुणांनी जातीच्या पलिकडे जाऊन मतदान केले आहे आणि त्यांनी भाजपला विजयी केले आहे. आता ही देशातल्या विद्वानांची जबाबदारी आहे की त्यांनी जातिवादाचे चष्मे उतरवून विजय अथवा पराजय याचे विश्लेषण केले पाहिजे.


    PM Modi Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे दौर्‍यातला भर राजकारणावर नव्हे; विद्यार्थ्यांशी संवादावरच का ठेवला…??


    याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रादेशिक राजकीय घराणेशाहीवर जोरदार प्रहार केला. केंद्रीय तपास संस्था भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी पुढे येतात. त्या नि:पक्षपाती संस्था असताना देखील प्रादेशिक घराणेशाहीतले लोक या संस्थांच्या विरुद्ध वेगवेगळ्या पद्धतीचे वातावरण तयार करतात. त्याला जातिवादाचा, धर्मवादाचा, प्रांतवादाचा रंग देतात. पण भ्रष्टाचाराचा बीमोड करण्यासाठी आम्ही 100 % केंद्रीय तपास संस्थांच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी दिली.

    – घराणेशाहीचा भ्रष्टाचार मोडा

    राजकीय घराणेशाहीचे लोक हजारो कोटींचा भ्रष्टाचार करतात आणि भ्रष्टाचार लपवण्यासाठी जात – धर्म – प्रांत या मुद्द्याचा आधार घेऊन केंद्रीय तपास संस्था आणि न्यायालयाच्या नि:पक्षपातीपणा विरुद्ध आवाज उठवत राहतात. यामध्ये त्यांना देशातल्या राजकीय विश्लेषक विद्वानांची देखील साथ मिळताना दिसते. यावर देखील मोदींनी हल्लाबोल केला.

    – जातिवादा पलिकडचे यश

    भाजपचा विजयाचे रहस्य जातिवादाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांच्या कल्याणकारी योजना राबवल्या मध्येच आहे. देशातल्या युवा शक्तीचा विधायक वापर करून त्यांना संधी देण्यात आहे, हे भारतातल्या राजकीय विद्वानांच्या लक्षात येत नाही किंवा लक्षात आले तरी ते मांडत नाहीत. ते प्रादेशिक पक्षांच्या घराणेशाहीच्या चष्म्यातूनच आणि जातिवादाच्या मानसिक तेथूनच विजय किंवा पराभवाकडे बघतात, असे शरसंधान पंतप्रधान मोदींनी केले.

    – योजनांची यशस्विता

    उत्तर प्रदेशासह चार राज्यांमध्ये केंद्रातल्या योजना यशस्वी झाल्या. सर्वसामान्यांचे जीवन सुकर झाले आणि म्हणूनच जनतेने भाजपला एवढे भरभरून मतदान केले, याकडे त्यांनी आवर्जून लक्ष वेधले. भाजपच्या विजयात महिलांचा युवकांचा सर्वात मोठा वाटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशात 2022 च्या निकालांनी 2024 ची वाट मोकळी केली आहे असेही ते म्हणाले.

    U. P. Elections Modi speech bjp office

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे