• Download App
    U. P. Elections : उत्तर प्रदेशात मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात भाजप, समाजवादी, बसप नेत्यांचे विजय - पराजयाचे "राणा भीमदेवी दावे"!! । U. P. Elections: BJP, Samajwadi, BSP leaders win in the last phase of voting in Uttar Pradesh - "Rana Bhimdevi claims" of defeat !!

    U. P. Elections : उत्तर प्रदेशात मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात भाजप, समाजवादी, बसप नेत्यांचे विजय – पराजयाचे “राणा भीमदेवी दावे”!!

    वृत्तसंस्था

    लखनऊ : उत्तर प्रदेशात आजच्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात भाजप, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्ष यांच्या नेत्यांनी बडे बडे दावे केले आहेत. राज्यात 59 मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. यामध्ये प्रामुख्याने वाराणसी सह पूर्वांचलातील 59 मतदारसंघांचा समावेश आहे. U. P. Elections: BJP, Samajwadi, BSP leaders win in the last phase of voting in Uttar Pradesh – “Rana Bhimdevi claims” of defeat !!

    उत्तर प्रदेशात मोदी आणि योगी यांच्या डबल इंजिन सरकारची जादू चालली आहे. भाजप 325 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील मंत्री राम शंकर तिवारी यांनी केला आहे, तर दुसरीकडे मोदी आणि योगी यांचे डबल इंजिन सरकार पूर्णपणे फेल झाले आहे. उत्तर प्रदेशात भाजप 100 – 150 जागांच्या आतच गुंडाळला जाईल, असा दावा बहुजन समाज पक्षाचे खासदार अफजल अन्सारी यांनी केला आहे. तर तिसरीकडे समाजवादी पार्टी आणि सोहेल देव समाज पक्ष यांच्या युतीचे नेते ओमप्रकाश राजभर यांनी पूर्वांचल मध्ये भाजप 59 पैकी एकही जागा जिंकू शकणार नाही. वाराणसी मध्ये समाजवादी पार्टी आणि सोहेल देव समाज पक्ष युती 8 पैकी 6 जागा जिंकेल. पूर्वांचल मध्ये मऊ, गाजियाबाद, गाजीपूर या क्षेत्रांमध्ये भाजपचे कोणतेही स्थान उरणार नाही, असा दावा केला आहे आहे.



    आज सायंकाळी पाच वाजता मतदान संपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोलचे आकडे बाहेर येतील. परंतु, या एक्झिट पोलच्या आकड्यांच्या आधीच भाजपा समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्ष यांच्या नेत्यांनी बडे बडे दावे करून घेतले आहेत.

    U. P. Elections : BJP, Samajwadi, BSP leaders win in the last phase of voting in Uttar Pradesh – “Rana Bhimdevi claims” of defeat !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम यांच्याकडे दुहेरी पदभार गंभीर घटनाबाह्य कृत्य; असीम सरोदेंमार्फेत कायदेशीर नोटीस

    Anurag Thakur : अनुराग ठाकूर म्हणाले- गरज असते तिथे राहुल गांधी नेहमीच दांडी मारतात; भारत विरोधासाठीच गांधी अग्रेसर

    Naxalite Sujata : तब्बल 2 कोटींचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षली सुजाताचे आत्मसमर्पण; 43 वर्षांपासून होती दहशत