• Download App
    पॉलिग्राफ टेस्ट करायला आणलेल्या आफताबच्या व्हॅनवर दोन तरूणांचा तलवारींनी हल्ल्याचा प्रयत्न Two youths attack with swords on Aftab's van which was brought for polygraph test

    पॉलिग्राफ टेस्ट करायला आणलेल्या आफताबच्या व्हॅनवर दोन तरूणांचा तलवारींनी हल्ल्याचा प्रयत्न

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हिचे ३६ तुकडे करून तिचा निर्घृण खून करणारा आफताब याला सोमवारी, २८ नोव्हेंबर रोजी पॉलिग्राफी टेस्टसाठी आणण्यात आले. त्यावेळी त्याला जेव्हा पोलिसांच्या वाहनात बसवण्यात आले होते, त्यावेळी आफताबचे तुकडे करण्यासाठी तलवारी घेऊन काही जण तिथे आले. त्यामुळे पोलिसांची धांदल उडाली होती. हे दोघेजण हिंदू सेनेचे असल्याचा संशय आहे. Two youths attack with swords on Aftab’s van which was brought for polygraph test

    पोलिसांचा हवेत गोळीबार 

    आफताब याला मारण्यासाठी आलेल्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत फायरिंग केली. त्यानंतर आफताबला घेऊन पोलिसांची गाडी जेलकडे रवाना झाली. हल्लेखोरांनी पोलीस व्हॅनवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अफताब पुनावाला याची पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली. त्यानंतर त्याला लॅबमधून जेलमध्ये नेले जात होते. या दरम्यान चार-पाच जणांनी हातात तलवार घेऊन अफताबवर हल्ल्याचा प्रयत्न केला. यावेळी हल्लेखोरांनी अफताब ज्या पोलीस व्हॅन होता त्या व्हॅनवर तलवारीने हल्ला केला. पोलिसांनी यावेळी त्यांना दूर सारण्याचा प्रयत्न केला.

    या दरम्यान प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींनी हल्ला करणाऱ्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी अफताब विषयीचा संताप व्यक्त केला. आमच्या माता-बहिणींवर अत्याचार करत आहेत. मग त्याला अशाप्रकारे का मारु नये?, असा प्रतिप्रश्न एकाने केला.

    Two youths attack with swords on Aftab’s van which was brought for polygraph test

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!