विशेष प्रतिनिधी
श्रीनगर – सुरक्षा दलाने काश्मीरात दोन व्यापारी आणि दोन दहशतवादी अशा चार व्यक्तींना ठार मारले. दोन्ही व्यापारी दहशतवाद्यांचे पाठिराखे होते. Two terrorist died in gun battel
डॉ. मुदासीर गुल आणि अल्ताफ भट अशी व्यापाऱ्यांची नावे आहेत. हैदरपोरा येथील व्यापारी संकुलात त्यांची दुकाने होती. डॉ. गुल हा दंतवैद्यक होता. तो संगणक केंद्रही चालवायचा. अल्ताफ हा संकुलाचा मालक होता. हार्डवेअरचे एक आणि सिमेंट एक दुकानही तो चालवायचा.
दरम्यान, सुरक्षा दलाने व्यापाऱ्यांना मारल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. त्यांचे मृतदेह दफनविधीसाठी ताब्यात मिळावेत अशी मागणीही त्यांनी केली. साईमा भट हिने ट्विट द्वारे आरोप केला की आपल्या निरपराध काकांचा थंड डोक्याने खून करण्यात आला.
पोलिसांनी मात्र व्यापारी दहशतवाद्यांच्या गोळीबारात किंवा चकमकीत मारले गेल्याचे ठामपणे सांगितले. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता मृतदेह ताब्यात देता येणार नाहीत असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
श्रीनगरपासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या उत्तर काश्मीरमधील हंदवाडा येथे चार पार्थिवांचा दफनविधी झाल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
Two terrorist died in gun battel
महत्त्वाच्या बातम्या
- आता ‘ या ‘ जिल्ह्यात २० नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू
- Mumbai Cruise Drugs Case : गोसावी आणि खबऱ्याची चॅट उघड, मुंबई पोलीस एसआरकेची मॅनेजर पूजा ददलानी बजावणार तिसरी नोटीस
- पूर्वांचल एक्सप्रेस वे वर झालेल्या विमानांच्या गर्जना काय सांगताहेत…??; वाचा पंतप्रधानांच्या भाषणातून…!!
- मोठी बातमी : उद्यापासून करतारपूर कॉरिडॉर पुन्हा उघडणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली घोषणा