• Download App
    इटलीहून भारतात आलेल्या दोन विमानातील तब्बल १७३ प्रवाशांना कोरोनाची बाधा|Two planes fulled with corona pataiants

    इटलीहून भारतात आलेल्या दोन विमानातील तब्बल १७३ प्रवाशांना कोरोनाची बाधा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – गेल्या चोवीस तासात देशभरात तब्बल १ लाख १७ हजार ९४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. इटलीहून अमृतसरला आलेल्या दोन चार्टर्ड विमानात १७३ प्रवाशांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.Two planes fulled with corona pataiants

    दोन्ही विमानात मिळून २७६ हून अधिक प्रवासी होते. त्यांची रॅपिड ॲटीजेन चाचणी केली असता त्यात १७३ जणांना बाधा असल्याचे आढळून आले. अमृतसर विमानतळावर उतरलेल्या उर्वरित १०३ प्रवाशांचा चाचणी अहवाल येणे अद्याप बाकी आहे. काल देखील रोमहून आलेल्या चार्टर्ड फ्लाईटमधील १७९ पैकी १२५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.



    परदेशातून येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सात दिवसांचे गृहविलगीकरण अनिवार्य केले आहे. देशात वाढती रुग्णसंख्या पाहता सरकारने निर्णय घेतला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या पाहिली तर आतापर्यंत ३.५२ कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

    त्यापैकी ३.४३ कोटी बरे झाले असून ४.८३ लाख जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या साडेतीन लाख लोकांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    Two planes fulled with corona pataiants

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते

    Election Commission : 12 राज्यांमध्ये SIR- मसुदा यादीत 13% मतदार कमी झाले; UP मध्ये सर्वाधिक 2.89 कोटी मतदार यादीतून वगळले

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- रस्ते भटक्या कुत्र्यांपासून मोकळे करणे आवश्यक; ते अपघातांना कारणीभूत