• Download App
    उत्तर प्रदेशात कोरोनाग्रस्ताचा मृतदेह नदीत टाकताना रंगेहात पकडले, व्हिडीओमुळे खळबळ।Two people arrested in UP for throwing body in river

    उत्तर प्रदेशात कोरोनाग्रस्ताचा मृतदेह नदीत टाकताना रंगेहात पकडले, व्हिडीओमुळे खळबळ

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ : काही आठवड्यांपूर्वी उत्तर प्रदेशातच अनेक मृतदेह नदीत सोडून दिल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती. आता बलरामपूर येथे नदीच्या पुलावरून दोन जण कोरोना रुग्णाचा मृतदेह नदीत फेकत असल्याचा व्हिडिओ रिलीज झाला आहे. Two people arrested in UP for throwing body in river

    या दोघांपैकी एकाने पीपीई किटही घातलेले व्हिडिओत दिसून येते. हा व्हिडिओ २८ मे रोजीचा आहे. हा मृतदेह प्रेमनाथ मिश्र यांचा असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. कोरोनामुळे निधन झालेल्या प्रेमनाथ मिश्र यांचा मृतदेह नदीत फेकल्याच्या आरोपावरून पोलिसांनी दोन जणांना अट केली आहे. त्यापैकी एक जण मिश्र यांचा भाचा संचय शुक्ल आहे आणि दुसरा स्वच्छता कर्मचारी मनोज कुमार आहे.



    मिश्र यांना २५ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांचा २८ मे रोजी मृत्यू झाला. कोरोनाच्या निकषांनुसार त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रशासनाने कारवाई करत दोघांना अटक केली आहे.

    Two people arrested in UP for throwing body in river

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!