Jammu-Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील परिमपोरा भागात सुरक्षा दलांनी चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केले. सुरक्षा दलातील चकमकीत दोन अधिकारी आणि एक जवान जखमी झाले आहेत. अजूनही आणखी काही अतिरेकी या भागात लपून बसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यांना शोधण्यासाठी कारवाईही सुरू आहे. two militant killed in Jammu-Kashmir Encounter between the security forces and terrorists search going on
वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील परिमपोरा भागात सुरक्षा दलांनी चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केले. सुरक्षा दलातील चकमकीत दोन अधिकारी आणि एक जवान जखमी झाले आहेत. अजूनही आणखी काही अतिरेकी या भागात लपून बसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यांना शोधण्यासाठी कारवाईही सुरू आहे.
ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानी दहशतवादी होता आणि दहशतवादी संघटना लष्करचा अबरार हा सर्वोच्च कमांडर होता. ठार दहशतवाद्यांकडून दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील परिमपोरा भागातील मल्हुरा येथे सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दल जेव्हा गस्त घालण्यासाठी बाहेर पडले तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे.
काश्मीर पोलीस झोनने ट्विट केले की, “श्रीनगरच्या मल्हुरा परिमपोरा भागात एन्काउंटर सुरू झाले. पोलीस आणि सुरक्षा दल कार्यरत आहेत.” चकमकीमुळे स्थानिक विभाग रिकामे झाले आहेत.
हा दहशतवादी हल्ला त्यावेळी घडला आहे जेव्हा सुरक्षा दलाला काही काळापूर्वी मोठे यश मिळाले होते. काही तासांपूर्वी सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर नदीम अबरार याला अटक केली. त्याच्यासह एका दहशतवाद्याला अटकही करण्यात आली आहे. नदीम अबरार 2018 पासून लष्करात काम करत होते. आयजी काश्मीर विजय कुमार यांनी नदीम अबरारच्या अटकेचे वर्णन मोठे यश असल्याचे सांगितले आहे.
two militant killed in Jammu-Kashmir Encounter between the security forces and terrorists search going on
महत्त्वाच्या बातम्या
- अमूलचा गुजरातमध्ये दुधाला महाराष्ट्रापेक्षा अधिक दर ; २९ रुपये लिटरनेच खरेदी
- कोरोना लसीचे दोन्ही डोस घ्या, अन्यथा वेतन रोखू; पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांना इशारा
- MONSTER-Twitter : अक्षम्य अपराध वारंवार ;भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीर आणि लडाखला वगळलं ; भारतीय भडकले
- फ्रंट पॅसेंजर एअरबॅगची अनिवार्यता पुढे ढकलली ; ३१ डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत मुदत वाढवली
- दोन हजार किलोमीटर पल्ल्याच्या अग्नी प्राईमची चाचणी यशस्वी