प्रतिनिधी
जयपूर : बहिणीच्या दिराच्या प्रेमात पडून विवाह केल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, ती चक्क बहिणीच्या नणंदेच्या प्रेमात पडली. या २२ वर्षीय तरुणीने बहिणीच्या १८ वर्षाच्या नणंदेशी चक्क पळून जाऊन लग्न केले.Two girls fell in love, , a 22 year old girl got married to an 18 year old girl.
एक 22 वर्षीय तरुणी सुमारे एक वषार्पूर्वी आपल्या बहिणीच्या सासरच्या घरी आली. येथे तिची बहिणीच्या नणंदेशी भेट झाली. या दोघींच्या भेटीगाठी चांगल्याच वाढू लागल्या आणि जवळीक इतकी वाढली की दोघी एकमेकांच्या प्रेमात पडल्या. विशेष म्हणजे मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानच्या चुरू येथे ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही मुली एकमेकींवर प्रेम करतात आणि त्यांना एकत्र राहायचे आहे. दोघींना खूप समजावले पण पटले नाही. मुलींकडे हरियाणात लिव्ह-इन रिलेशनशिपची कागदपत्रे मिळाली आहेत. त्यांच्याकडे लग्नाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे नाहीत.
यातील अठरा वर्षाच्या मुलीच्या वडीलांनी सांगितले की, मुलीला मी खूप समजावले. पण तरीही ती ऐकत नाही, तिला आम्ही सांगितलेले पटत नाही. माझी मुलगी तशी अजिबात नव्हती. कुठल्या ना कुठल्या दबावात किंवा काहीतरी जादूटोणा झाल्याने ती तिच्यासोबत गेली असावी.
तीन भावंडांमध्ये ती सर्वात लहान आहे. भाऊ मजुरीचे काम करतो तर दुसरा अपंग आहे. मुलगी सातवीपर्यंत शिकली आहे. मुलीनं हे चुकीचं केलं आहे, पण आता मी तिला कसं समजावू? ती काही समजून घ्यायला तयार नाही.
Two girls fell in love, , a 22 year old girl got married to an 18 year old girl.
महत्त्वाच्या बातम्या
- मित्रांनीच वाढविली अखिलेश यादव यांची डोकेदुखी, जागावाटपाचा फैैसला होईना
- पत्नीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी डॉक्टरने केली पाच कोटी रुपयांची संपत्ती दान
- शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दर वेळेला पवारांची “उंची” का सांगावी लागते??
- पवारांची उंची आणि राष्ट्रीय राजकारणाचे स्थान लक्षात घेऊन नव्या पिढीने बोलावे; फडणवीसांना अजितदादांचे प्रत्युत्तर!!