• Download App
    अरे बापरे... ओडिशात अवघ्या अर्ध्या तासात नागरिकास दिले लसीचे दोन डोस। Two doses of vaccine given within one hour

    अरे बापरे… ओडिशात अवघ्या अर्ध्या तासात नागरिकास दिले लसीचे दोन डोस

    विशेष प्रतिनिधी

    भुवनेश्वर : रोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेऊन देखरेख कक्षात आराम करणाऱ्या व्यक्तीला निष्काळजीपणाने पुन्हा डोस दिल्याचा धक्कादायक प्रकार ओडिशात उघडकीस आला. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. Two doses of vaccine given within one hour



    मयुरभंज येथील प्रसन्नकुमार साहू (वय ५१) हे रघुपुर येथील रहिवासी आहेत. त्यांनी लस घेण्यासाठी स्लॉट बुक केला होता. त्यानंतर ते खुंटापूर येथील सत्यसाई सरकारी शाळेतील लसीकरण केंद्रावर गेले. तेथे पहिला डोस दिल्यानंतर अर्धा तास देखरेख कक्षात थांबण्यास सांगितले. परंतु यादरम्यान एका परिचारिकेने चुकून दुसरा डोस दिला. याबाबत साहू म्हणाले, मी संबंधित परिचारिकेस लस घेतल्याचे सांगेपर्यंत त्यांनी घाईगडबडीत पुन्हा लस दिली.

    दोन डोस दिल्यानंतर त्यांना आणखी दोन तास केंद्रावरच थांबवण्यात आले. तसेच ओआरएस देण्यात आले. या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाने दिले असून चुकीने दिलेल्या दुसऱ्या डोसचा दुष्परिणाम अद्यापपर्यंत झाला नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

    Two doses of vaccine given within one hour

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Justice Nagaratna : न्यायमूर्ती नागरत्ना SCच्या कॉलेजियमशी असहमत; न्यायमूर्ती विपुल पंचोलींच्या SCत नियुक्तीवर आक्षेप

    जेव्हा संघाने चालविल्या होत्या काँग्रेसच्या NSUI अधिवेशनसाठी खानावळी; डॉ. मोहन भागवतांनी सांगितली त्यांची कहाणी!!

    Commonwealth Games : 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारत बोली लावणार; मंत्रिमंडळाची मंजुरी, अंतिम मुदत 31 ऑगस्ट