वृत्तसंस्था
श्रीनगर : रमजान महिना सुरू असतानाच जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर मधील सर्वात मोठी मशीद जमा मशीद दोनच आठवड्यांपूर्वी उघडण्यासाठी उघडण्यात आली. शुक्रवारचा नमाज पठणाच्या वेळी तिथे काही लोकांनी आजादीच्या मोठमोठ्या घोषणा दिल्या. या घोषणांचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला. आता श्रीनगर पोलिसांनी आजादीच्या घोषणा देणाऱ्यांना शोधून काढले असून त्यापैकी 13 जणांना अटक करण्यात आली आहे. Tukde Tukde Gang Declaration of Independence at Jama Masjid in Srinagar
श्रीनगर मध्ये तुकडे तुकडे गॅंग पुन्हा सक्रिय झाल्याचे हे निदर्शक आहे. या आधी काश्मीरमध्ये फुटीरतावाद वाढला असताना आजादीच्या घोषणा देण्यात येत असत. त्यानंतर दिल्लीत शाहीन बाग मध्ये सीएए आणि एन आर सी कायद्याविरोधात आंदोलन करताना दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आजादीच्या घोषणा दिल्या होत्या.
महिना दीड महिन्यापूर्वी “द काश्मीर फाईल्स” हा सिनेमा रिलीज झाला. त्याने भारत आणि भारताबाहेर बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. त्यापेक्षाही 1990 च्या दशकात काश्मीर मध्ये झालेल्या हिंदू नरसंहाराचे सत्य बाहेर आणले.
या पार्श्वभूमीवर श्रीनगरमध्ये टुकडे टुकडे गँग पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच जामा मशिदीत शुक्रवारचा नमाज पठणाच्या वेळी आजादीच्या घोषणा देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. आजादीच्या घोषणा देणाऱ्या पैकी 13 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
Tukde Tukde Gang Declaration of Independence at Jama Masjid in Srinagar
महत्त्वाच्या बातम्या
- महात्मा गांधी तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता, त्यांचे पुतळे हटविल्यावर गोडसेंच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करावी, मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीचे वक्तव्य
- मोदी मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय : आता रेशन दुकानांवर मिळणार फोर्टिफाइड तांदूळ, योजनेवर वर्षाला २७०० कोटी खर्च करणार सरकार
- 2050 पर्यंत देशातील 6 शहरे बुडणार : मुंबईतील एक हजार इमारती जाणार पाण्याखाली, हाजी अली आणि वरळी सी-लिंक पाण्याखाली जाणार