Balaji Temple in Jammu : जम्मू-काश्मीर प्रशासनाने गुरुवारी मंदिर आणि संबंधित इमारतींच्या बांधकामासाठी तिरुमाला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ला जवळपास 25 हेक्टर जमीन 40 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. TTD Sansthanam will build Balaji Temple in Jammu, land leased for 40 years
विशेष प्रतिनिधी
जम्मू : जम्मू-काश्मीर प्रशासनाने गुरुवारी मंदिर आणि संबंधित इमारतींच्या बांधकामासाठी तिरुमाला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ला जवळपास 25 हेक्टर जमीन 40 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली आहे. एका सरकारी प्रवक्त्यानुसार, 25 हेक्टर जमिनीवर भाविकांच्या सोयीसाठी एक कॅम्पस, वेद पाठशाळा, आध्यात्मिक / योग केंद्र, एक कार्यालय, निवासी परिसर आणि पार्किंग क्षेत्र असेल.
ते म्हणाले की, भविष्यात वैद्यकीय व शिक्षण केंद्रेही बांधली जातील. तामिळनाडू सरकारने टीटीडी अधिनियम 1932 अन्वये टीटीडीची स्थापना केली आहे. ही एक सेवाभावी संस्था आहे आणि आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांमध्ये उपक्रम राबवते.
प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये टीटीडीच्या आगमनामुळे पर्यटन क्षेत्रात वाढ होईल. विशेषत: जम्मूला मंदिरांचे शहर म्हणूनही ओळखले जाते, त्यामुळे भाविकांच्या पर्यटनात वाढ होईल. पर्यटनात वाढ झाल्याने आर्थिक उलाढालीही वाढतील.
TTD Sansthanam will build Balaji Temple in Jammu, land leased for 40 years
महत्त्वाच्या बातम्या
- UPSC मुलाखतीची तयारी करणार्या उमेदवारांना ‘ बार्टी ‘ देणार अर्थसहाय्य : वाचा सविस्तर
- …ते सध्या काय करतात! RBIचे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल आता बिस्किटांच्या ‘या’ कंपनीत मोठ्या हुद्द्यावर
- केंद्राची अन्न प्रक्रिया उद्योगासाठी 10,900 कोटी रुपयांची PLI योजना, 2.5 लाख रोजगारनिर्मितीसह भारत बनणार फूड ब्रँड्सचे हब
- पाकची विपरीत बुद्धी, ‘महागाई सहन करू, पण भारताकडून घ्यायचं नाही’; इमरान खान यांनी बदलला आयातीचा निर्णय
- मोदींनी डिवचल्यावर ममतांचे प्रत्युत्तर; तुम्ही मतदानाच्याच दिवशी कसे बंगालमध्ये येता..!! हा तर निवडणूक आचारसंहितेचा भंग