• Download App
    Trolling Arshdeep is part of Pakistani ISI toolkit to instigate khalistani movement|Trolling Arshdeep is part of Pakistani ISI toolkit to instigate khalistani movement

    अर्शदीपला खलिस्तानी संबोधणे : “प्रोजेक्ट केरोसीन”ने भारतात देशाची आग फैलावण्याचे पाकिस्तानी कारस्थान!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारत – पाकिस्तान आशिया कप सामन्याच्या निमित्ताने हिंदू आणि शीख यांच्यात द्वेषभावनापासून हिंदुस्थानात आग लावण्याचे मोठे कारस्थान पाकिस्तानात सुरू आहे आणि त्याला पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISI चे प्रचंड पाठबळ मिळते आहे.Trolling Arshdeep is part of Pakistani ISI toolkit to instigate khalistani movement

    भारतात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू असताना 4 सप्टेंबर रोजी झालेल्या भारत – पाकिस्तान सामन्याचा पाकिस्तानची गुप्तहेर संस्था इंटर सर्विसेस इंटेलिजन्स अर्थात ISI यात “सक्रिय” आहे. एका बाजूला भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानशी हा सामना खेळत होता, तर दुसरीकडे ISI दहशतवादी खेळ खेळत आहे. त्याला “प्रोजेक्ट केरोसीन” असे नाव देण्यात आले आहे. ज्याचे संपूर्ण टूलकिट खलिस्तान या नावाने चालू आहे आणि त्याचे तीन टप्पे आहेत.



    भारताविरुद्ध माहितीचे युद्ध सुरू आहे. हे युद्ध दहशतवादी कारवायांचा मुख्य सूत्रधार ISI च्या योजनेनुसारच सुरू आहे.

    प्रत्यक्ष सामना जेव्हा सुरू होता तेव्हा ISI “प्रोजेक्ट केरोसीन”चा “स्फोट” घडवून आणण्यासाठी संधीच पाहत होती. सामन्यातील १८व्या षटकात पाकिस्तान फलंदाजी करत असताना ही संधी मिळाली. या सामन्यात खेळपट्टीवर चांगलाच जम बसवलेला आसिफ अलीचा झेल भारताचा गोलंदाज अर्शदीप सिंग याच्या हातून हुकला आणि पाकिस्तानने सामना जिंकला. त्याच क्षणी आयएसआयची “प्रोजेक्ट केरोसीन” कारस्थान कार्यान्वित झाले.

     प्रोजक्ट केरोसीन

    भारत आणि जगभरात राहत असलेल्या शिखांमध्ये ‘हिंदू धर्मियांविषयी द्वेष भावना पसरवणे. त्यामुळेच खलिस्तानची निर्मिती शिखांसाठी आवश्यक आहे, हे विष वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

    ISI च्या प्लांटेड हँडल्सद्वारे अर्शदीपवर खलिस्तानी टिप्पणी – इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (ISI) च्या प्लांटेड सोशल मीडिया अकाउंटवर कॅच सोडल्याबद्दल अर्शदीप सिंगवर हल्ला करण्यात आला. उजव्या विचारसरणीच्या लोकांना तो शीखविरोधी असल्याचे दाखवणे हा त्याचा उद्देश होता.

    प्लांटेड हँडल्स ऑफ राईट विंग म्हणत भारतातील प्रसिद्ध डाव्या विचारवंत हँडल्सवर हल्ला – भारतातील प्रसिद्ध सोशल मीडिया हँडल्सवरून अर्शदीप सिंगचा बचाव करताना हिंदूंवर (उजव्या विंग) हल्ला करण्याची योजना आखली होती. यामध्ये हिंदूंना शिखांच्या विरोधात दाखवण्याचा उद्देश आहे. भारतीय नेत्यांचा प्रवेश आणि अर्शदीपला पाठिंबा, ISI प्लांटेड हेडल्सवर हल्ला – अर्शदीपचे समर्थन आणि हिंदू (उजव्या विंग) विचारसरणीच्या हँडलवर भारतातील वरिष्ठ विरोधी नेत्यांचा एक घणाघाती हल्ला असेल.

     अपप्रचाराच्या विरोधात एफआयआर

    या एपिसोडमध्ये भाजपचे नेते मनजिंदर सिरसा यांनी एफआयआर दाखल केला आहे. मनजिंदर सिंग सिरसा यांनी त्यांच्यावर भारतीय शीखांविरुद्ध द्वेषपूर्ण मोहीम चालवल्याचा आरोप केला आहे. यामध्ये अल्ट न्यूजचा मोहम्मद जुबेरवर पाकिस्तानी कारस्थानाला पाठिंबा असल्याचा आरोप आहे. झुबेरच्या सोशल मीडिया हँडलचे स्क्रीन शॉट्स पाकिस्तानी हँडल्सने वापरल्याचा आरोप सिरसा यांनी केला आहे. खलिस्तानी अजेंडा तयार केल्याप्रकरणी मोहम्मद जुबेरची चौकशी झाली पाहिजे.

    Trolling Arshdeep is part of Pakistani ISI toolkit to instigate khalistani movement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य