• Download App
    तृणमूळचा राष्ट्रीय दर्जा : अमित शाहांना फोन केल्याचे सिद्ध झाले तर राजीनामा देईन; ममतांचे आव्हान|Trinamool's national status: Will resign if proved to have called Amit Shah; Mamta's challenge

    तृणमूळचा राष्ट्रीय दर्जा : अमित शाहांना फोन केल्याचे सिद्ध झाले तर राजीनामा देईन; ममतांचे आव्हान

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस या दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांनी आपल्या निवडणूक परफॉर्मन्सच्या आधारावर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने याविषयी फार तीव्र प्रतिक्रिया दिलेली नाही, पण तृणमूल काँग्रेस मधून त्याविषयी तीव्र प्रतिक्रिया आली आहे.Trinamool’s national status: Will resign if proved to have called Amit Shah; Mamta’s challenge

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूळ काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा टिकून ठेवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला होता, असा आरोप पश्चिम बंगाल विधानसभेतले विरोधी पक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांनी केला होता. सुवेंदू अधिकारी यांच्या या आरोपाला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा टिकवण्यासाठी मी अमित शहा यांना फोन केल्याचे सिद्ध झाले, तर मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन, असे आव्हान बॅनर्जी यांनी सुवेंदू अधिकारी यांना दिले आहे. तृणमूल काँग्रेसला जनतेचा आशीर्वाद आहे. जनतेच्या पाठिंब्याच्या बळावर आम्ही सत्तेवर आहोत. आम्हाला त्यासाठी भाजपच्या कोणत्याही नेत्याच्या पाठिंब्याची गरज नाही. असे असताना मी कशाला अमित शहा यांना फोन करेन? मी अमित शहा यांना फोन केल्याचे सिद्ध झाले, तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन, असे वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.



    कोणत्याही राजकीय पक्षाची सत्ता कायमची टिकत नाही. आज भाजप सत्तेवर आहे म्हणून ते विरोधकांना केंद्रीय यंत्रणांचा वापर करून त्रास देत आहे. मालमत्तांवर बुलडोजर चालवत आहेत. पण देशात संविधान आणि कायदा अस्तित्वात आहे. त्या संविधानावर भाजप सरकारला बुलडोजर चालवता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

    ममतांचे राजकीय दुखणे काय?

    तृणमूळ काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा गमावल्याने ममता बॅनर्जींच्या पंतप्रधान पदाच्या महत्त्वाकांक्षेला जबर धक्का बसला आहे. वास्तविक पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकून राहावा म्हणून तृणमूळ काँग्रेसने पश्चिम बंगाल बाहेर पूर्वोत्तर राज्यांमध्ये तसेच गोवा या राज्यांमध्ये देखील निवडणूक लढवली होती. हरियाणापर्यंत आपल्या पक्षाचा ममता बॅनर्जींनी संघटनात्मक विस्तार केला आहे. पण तृणमूल काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकवून ठेवण्यात त्यांना यश आले नाही. कारण पूर्वोत्तर राज्य आणि गोव्यामध्ये त्यांना अपेक्षित 6 % मते मिळाली नाहीत. त्यामुळे पक्षाचा तृणमूळ काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा संपुष्टात आला आणि याचा परिणाम ममता बॅनर्जी यांच्या राष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वेकांक्षावर झाला आहे. काँग्रेस सोडून बाकीच्या प्रादेशिक विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्या म्हणून त्यापुढे येऊ पाहत होत्या. पण आता त्यांना शरद पवार, के. सी. चंद्रशेखर राव, उद्धव ठाकरे, एम. के. स्टालिन यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्यांच्याच फळीत बसावे लागणार आहे. ममता बॅनर्जींचे खरे राजकीय दुखणे हे आहे.

    Trinamool’s national status: Will resign if proved to have called Amit Shah; Mamta’s challenge

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Delhi High Court पत्नीला पतीची संपत्ती मानण्याची कल्पना असंवैधानिक; दिल्ली उच्च न्यायालयाने दिला महाभारतातील द्रौपदीचा संदर्भ

    मुर्शिदाबाद मधील दंगल पीडित महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी बंगाल सरकारची, त्यात राजकारण आणि कुचराई नको; NCW अध्यक्षांनी सुनावले!!

    बंगाल आणि बांगलादेश यांच्यातला फरक पुसला; पश्चिम बंगाल राज्य निर्मितीचा हेतूच ममतांनी उद्ध्वस्त केला!!