• Download App
    तृणमूलतर्फे प्रसार भारतीचे माजी सीईओ जवाहर सरकार यांना राज्यसभेवर उमदेवारी दिली, त्यांच्याबद्दल जाणून घ्या । Trinamool Congress nominates ex-Prasar Bharati CEO Jawhar Sircar to Rajya Sabha

    तृणमूलतर्फे प्रसार भारतीचे माजी सीईओ जवाहर सरकार यांना राज्यसभेवर उमदेवारी, जाणून घ्या त्यांच्याबद्दल !

    Jawhar Sircar : तृणमूल कॉंग्रेसने (टीएमसी) प्रसार भारतीचे माजी सीईओ जवाहर सरकार यांना राज्यसभेवर उमेदवारी दिली आहे. टीएमसीने ट्वीट केले की, संसदेच्या वरिष्ठ सभागृहात जवाहर सरकार यांना उमेदवारी देण्यात आम्हाला आनंद होत आहे. सरकार यांनी सार्वजनिक सेवेत जवळजवळ 42 वर्षे व्यतीत केली, ते प्रसार भारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील होते. सार्वजनिक सेवेत त्यांचे अमूल्य योगदान आम्हाला आपल्या देशाची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करण्यात मदत करेल! Trinamool Congress nominates ex-Prasar Bharati CEO Jawhar Sircar to Rajya Sabha


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : तृणमूल कॉंग्रेसने (टीएमसी) प्रसार भारतीचे माजी सीईओ जवाहर सरकार यांना राज्यसभेवर उमेदवारी दिली आहे. टीएमसीने ट्वीट केले की, संसदेच्या वरिष्ठ सभागृहात जवाहर सरकार यांना उमेदवारी देण्यात आम्हाला आनंद होत आहे. सरकार यांनी सार्वजनिक सेवेत जवळजवळ 42 वर्षे व्यतीत केली, ते प्रसार भारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील होते. सार्वजनिक सेवेत त्यांचे अमूल्य योगदान आम्हाला आपल्या देशाची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करण्यात मदत करेल!

    जवाहर सरकार (जन्म 22 मार्च 1952) 69 वर्षे वयाचे सेवानिवृत्त भारतीय प्रशासनिक सेवा (आयएएस) अधिकारी आणि प्रसार भारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. नोव्हेंबर 2008 ते फेब्रुवारी 2012 या काळात त्यांनी भारतीय संस्कृती मंत्रालयाचे अध्यक्षपद भूषवले. त्यांनी युनेस्कोसह सर्वोच्च आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि वारसा संवर्धनाशी संबंधित सार्वजनिक विषयांवर नियमितपणे भाषणे व लेखन केले आहे.

    ते भारताच्या सार्वजनिक प्रसारकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (२०१२ – २०१६) होते. पारदर्शकता आणि निष्पक्षतेसाठी उभे होते, यामुळे त्यांना अकाली राजीनामा द्यावा लागला, कारण सध्याच्या राजवटीबद्दल आणि त्यातील धोरणांवर त्यांचा आक्षेप होता. जवाहर सरकार यांचे अनेक वर्षांपासून नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मासिके आणि वर्तमानपत्रांमध्ये, पुस्तकांमध्ये सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि मानववंशविषयक विषयांवर अनेक लेख प्रकाशित झाले आहेत.

    Trinamool Congress nominates ex-Prasar Bharati CEO Jawhar Sircar to Rajya Sabha

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले