• Download App
    भाजपाच्या कार्यकर्त्यांवर सामाजिक बहिष्काराचे तृणमूल कॉँग्रेसचे आवाहन, १८ कार्यकर्त्यांची यादी जाहीर करून त्यांना वस्तू देण्यास दुकानदारांना मनाई |Trinamool Congress appeals for social boycott of BJP workers, announces list of 18 workers and bans shopkeepers from giving them goods

    भाजपाच्या कार्यकर्त्यांवर सामाजिक बहिष्काराचे तृणमूल कॉँग्रेसचे आवाहन, १८ कार्यकर्त्यांची यादी जाहीर करून त्यांना वस्तू देण्यास दुकानदारांना मनाई

    पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांत तृणमूल कॉँग्रेसने मोठा विजय मिळविल्यावर आता कायद्याचे राज्य मानण्यासही नकार दिला आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सामाजिक बहिष्कार घालण्याचे आवाहन त्यांच्या स्थानिक नेत्यांकडून सुरू झाले आहे. बहिष्कार घालण्याचे आवाहन करणे गंभीर गुन्हा असतानाही त्यावर कारवाई झालेली नाही.Trinamool Congress appeals for social boycott of BJP workers, announces list of 18 workers and bans shopkeepers from giving them goods


    विशेष प्रतिनिधी

    कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांत तृणमूल कॉँग्रेसने मोठा विजय मिळविल्यावर आता कायद्याचे राज्य मानण्यासही नकार दिला आहे.

    भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सामाजिक बहिष्कार घालण्याचे आवाहन त्यांच्या स्थानिक नेत्यांकडून सुरू झाले आहे. बहिष्कार घालण्याचे आवाहन करणे गंभीर गुन्हा असतानाही त्यावर कारवाई झालेली नाही.



    तृणमूल कॉँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी भाजपाच्या अठरा कार्यकर्त्यांची एक यादी ट्विटरवर जाहीर केली आहे. दुकानदारांना आदेश देण्यात आले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचे जीवनावश्यक साहित्य देण्यात येऊ नये.

    अगदी चहासुध्दा त्यांना कोणी देऊ नये असे म्हटले आहे. पश्चिम बंगाल भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष केया घोष यांनी ही यादीच जाहीर केली. मात्र, तरीही पोलीसांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही.

    घोष म्हणाल्या, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मुद्दामहून लक्ष्य करण्यात येत आहे. त्यांना काही खरेदी करायची असेल तरी तृणमूल कॉँग्रेसला विचारावे लागणे म्हणजे राज्यातील कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती झाली आहे हे लक्षात येईल.

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे म्हटले आहे. राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी यांनी सर्व नागरिकांशी समान व्यवहार केला पाहिजे. त्यांनी ते केले नाही तर लज्जास्पद ठरेल.

    भारतीय जनता पक्षाचे नेते स्वपन दासगुप्ता म्हणाले की, बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. त्यांना आर्थिक पातळीवर नुकसान पोहोचविले जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न आहे.

    Trinamool Congress appeals for social boycott of BJP workers, announces list of 18 workers and bans shopkeepers from giving them goods

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!