वृत्तसंस्था
जम्मू : जम्मू काश्मीर मधल्या प्रत्येक पंचायतीत 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकला, हेच जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मूफ्ती यांना प्रत्युत्तर आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी केली आहे. Tricolour was hoisted in every panchayat of J&K on Independence Day. People no longer support her & they know how she exploited them.
अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर सुरसुरी आलेल्या मेहबूबा मुफ्ती यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देऊन टाकली. जम्मू-काश्मीरच्या लोकांना हलक्याक घेऊ नका. आम्हाला छोटे समजू नका. एखादी लहान मुंगी हत्तीच्या सोंडेत शिरली तर त्याला जीव नकोसा करते, अशा भाषेत मेहबूबा यांनी मोदींना फटकारले होते.
जम्मू काश्मीर तोडलेत हे चांगले केले नाहीत. तुम्ही जे लुटले ते बेकायदा आहे. काश्मीर यांना राज्याचा दर्जा परत द्या, अशी मागणी त्यांनी धमकी स्वरूपात केली होती.
मेहबूबा यांच्या या धमकीला कैलास विजयवर्गीय यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरच्या जनतेला हे पक्के माहिती आहे की मेहबूबांसारख्याच नेत्यांनी त्यांना लुटले आहे. ज्यांनी काश्मीरींची पिळवणूक केली. त्यांनी केंद्र सरकारला काय धमक्या द्याव्यात? काश्मीरच्या गावागावात प्रत्येक पंचायतीमध्ये 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी तिरंगा फडकला हेच मेहबूबा मुफ्ती यांच्यासारख्या नेत्यांना खणखणीत प्रत्युत्तर आहे, असे टीकास्त्र कैलास विजयवर्गीय यांनी सोडले.
Tricolour was hoisted in every panchayat of J&K on Independence Day. People no longer support her & they know how she exploited them.
महत्त्वाच्या बातम्या
- मनी मॅटर्स : फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स (एफएमपी) बाबत अनेकांना नसते माहिती, एफएमपीत अशी करा गुंतवणूक
- राममंदिर लढ्याचा महानायक काळाच्या पडद्याआड!
- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मोफत ‘मोदी’ एक्स्प्रेस; भाजप आमदार नितेश राणे यांची घोषणा
- अफगाणिस्तान: भारतीय विमानाने 168 प्रवाशांना घेऊन काबूलमधून पुन्हा उड्डाण केले, आज हिंडन एअरबेसवर पोहोचेल