• Download App
    श्रध्दांजली मिल्खासिंग यांना की फरहान अख्तरला, नोएडाच्या स्टेडियमध्ये भाग मिल्खा भागचे पोस्टर्स|Tributes to Milkha Singh or Farhan Akhtar, posters of Bhag Milkha Bhag in the stadium of Noida

    श्रध्दांजली मिल्खासिंग यांना की फरहान अख्तरला, नोएडाच्या स्टेडियमध्ये भाग मिल्खा भागचे पोस्टर्स

    भारताचे ज्येष्ठ धावपटू आणि फ्लाईन्ग सिख म्हणून ओळखले जाणारे मिल्खा सिंग यांना देशभरातून श्रध्दांजली वाहिली जात आहे. मात्र, नोएडातील एका स्टेडियमध्ये मिल्खा सिंग यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी लावणाऱ्या पोस्टरवर भाग मिल्खा भाग या या चित्रपटातील फरहान अख्तर याचा फोटो वापरण्यात आला होता. याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.Tributes to Milkha Singh or Farhan Akhtar, posters of Bhag Milkha Bhag in the stadium of Noida


    विशेष प्रतिनिधी

    नोएडा : भारताचे ज्येष्ठ धावपटू आणि फ्लाईन्ग सिख म्हणून ओळखले जाणारे मिल्खा सिंग यांना देशभरातून श्रध्दांजली वाहिली जात आहे. मात्र, नोएडातील एका स्टेडियमध्ये मिल्खा सिंग यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी लावणाऱ्या  पोस्टरवर भाग मिल्खा भाग या या चित्रपटातील फरहान अख्तर याचा फोटो वापरण्यात आला होता. याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

    पत्रकार अनिशा दत्ता यांनी ट्विटरवर हा फोटो पोस्ट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की नोएडाच्या प्रशासनाला विनंती आहे की मिल्खा सिंग यांचा वास्तविक जीवनातील फोटो श्रध्दांजलीच्या पोस्टरवर वापरायला हवा. फरहान अख्तर याचा फोटो वापरणे योग्य नाही.



    हा फोटो ट्विटरवर व्हायरल झाला. वास्तविक जीवनातील फोटो वापरण्याऐवजी बायोपिकमधील अभिनेत्याचा फोटो वापरण्यावरून नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेकांनी तर हे नोएडा प्रशासनाचे लाजीरवाणे कृत्य असल्याचेही म्हटले आहे. रिअल हिरो माहित नसलेले ते मुर्ख आहेत तरी कोण? असा सवालही करण्यात आला आहे.

    महान व्यक्तींना अशा प्रकारे श्रध्दांजली वाहण्याची भारतात पध्दत नाही, असेही म्हटले जात आहे.भाग मिल्खा भाग हा चित्रपट मिल्खा सिंग यांचा बायोपिक आहे. यामध्ये अभिनेता फरहान अख्तर याने मिल्खा सिंग यांची भूमिका केली आहे. त्याच्या या भूमिकेचे खूप कौतुकही झाले. मिल्खा सिंग यांचे कर्तृत्व त्यामुळे नव्या पिढीसमोर आले.

    Tributes to Milkha Singh or Farhan Akhtar, posters of Bhag Milkha Bhag in the stadium of Noida

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!