• Download App
    राज्यात 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या : आस्तिककुमार पांडेय औरंगाबादचे जिल्हाधिकारी|Transfer of 20 Chartered Officers in the State Astik Kumar Pandey Collector of Aurangabad

    राज्यात 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या : आस्तिककुमार पांडेय औरंगाबादचे जिल्हाधिकारी

    प्रतिनिधी

    मुंबई : राज्य शासनाने आज आणखी २० सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. २९ सप्टेंबर रोजी ४४ सनदी अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता लगेचच हे मोठे प्रशासकीय फेरबदल शिंदे-फडणवीस सरकारने केले आहेत. मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांना आता वैद्यकीय शिक्षण मुंबईचे आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले असून मुंबईच्या जिल्हाधिकारीपदाचा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे ठेवण्यात आला आहे. विरेंद्र सिंग यांना महाआयटी मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली, तर आस्तिककुमार पांडेय यांना औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.Transfer of 20 Chartered Officers in the State Astik Kumar Pandey Collector of Aurangabad



    मिताली सेठी यांना वनमती नागपूरच्या संचालकपदाची, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुशील चव्हाण यांच्याकडे विकास आयुक्त असंघटित कामगार या पदाची जबाबदारी देण्यात आली. अजय गुल्हाणे यांना नागपूरच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तपदाची तर दीपककुमार मीना यांना अतिरिक्त आदिवासी आयुक्त ठाणे या पदाची जबाबदारी देण्यात आली. विनय गौडा यांना चंद्रपूरचे जिल्हाधिकारी तर आर. के. गावडे यांना अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले. माणिक गुरसळ यांना अतिरिक्त आयुक्त उद्योग, शिवराज पाटील यांना महानंदचे महाव्यवस्थापकीय संचालक तर आस्तिककुमार पांडेय यांना औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

    लीना बनसोड यांना आदिवासी विकास महामंडळ नाशिकच्या महाव्यवस्थापकीय संचालकपदी तर दीपक सिंगला यांना एमएमआरडीए मुंबईच्या सहआयुक्तपदी नियुक्त करण्यात आले. एल. एस. माळी यांना ओबीसी बहुजन कल्याण संचालनालय पुणेच्या संचालकपदी, एस. सी. पाटील यांना उपमुख्यमंत्री कार्यालय मंत्रालयाच्या सहसचिवपदी नियुक्त करण्यात आले. डी.के. खिल्लारी यांना सातारा जि. प. च्या मुख्याधिकारीपदी, एस. के. सालीमठ यांना सिडको मुंबईच्या सहमहाव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त करण्यात आले. एस. एम. कुर्तकोटी यांना नंदूरबार जि. प. च्या मुख्याधिकारीपदी नियुक्त करण्यात आले. बी.एच. पालवे यांना पालघर जि. प. च्या सीईओपदी नियुक्त करण्यात आले. आर. एस. चव्हाण यांना मुद्रांक आणि वनविभाग मंत्रालयच्या सहसचिवपदी नियुक्त करण्यात आले.

    Transfer of 20 Chartered Officers in the State Astik Kumar Pandey Collector of Aurangabad

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी