• Download App
    'ट्रेजडी किंग' दिलीप कुमार यांच्यावर जुहू येथील कब्रस्तानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार tragedy King' Dilip Kumar Funeral at the cemetery at Juhu

    ‘ट्रेजडी किंग’ दिलीप कुमार यांच्यावर जुहू येथील कब्रस्तानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

    वृत्तसंस्था

    मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील महान अभिनेता आणि ‘ट्रेजडी किंग’ अशी ओळख असलेले दिलीपकुमार यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी जुहू येथील कब्रस्तानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. Tragedy King’ Dilip Kumar Funeral at the cemetery at Juhu

    बुधवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने वयाच्या ९८ व्या वर्षी दिलीपकुमार यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनामुळे टिव्ही आणि चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली. अंतिम दर्शनासाठी बॉलिवूडचे कलाकार आणि राजकीय नेतेमंडळी आली होती. अनेकांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

    अनेकजण दिलीपकुमार यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी आणि त्यांच्या पत्नी सायरा बानू यांचे सांत्वन करण्यासाठी आले होते. त्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, करण जौहर, अनिल कपूर, रणबीर कपूर, जॉनी लीवर, नेता शरद पवार, जॉनी लीवर, नेता छगन भुजबळ, रजा मुराद, धर्मेंद्र, शबाना आझमी, विद्या बालन, शाहरुख खान, अनुपम खेर यांच्यासह अन्य जणांचा समावेश होता.

    दिलीपकुमार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे त्यांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळून जुहू येथील कब्रस्तानात नेण्यात आले. तेथे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

    tragedy King’ Dilip Kumar Funeral at the cemetery at Juhu

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Judge Verma bench : जज वर्मा खंडपीठाच्या खटल्यांची पुन्हा सुनावणी होणार; 50 हून अधिक खटले प्रलंबित

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- अवमान याचिकेसाठी आमची आवश्यकता नाही; अॅटर्नी जनरलची परवानगी घ्या

    Lucknow High Court : लखनऊ हायकोर्टाने केंद्राला म्हटले- राहुल ब्रिटिश आहेत की नाही, 10 दिवसांत रिपोर्ट द्या!