विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – उद्योगांतील लाचखोरीच्या जोखमीबाबतीत आंतरराष्ट्रीय क्रमवारीमध्ये भारताचे स्थान पाच अंकांनी घसरले असून यंदा भारत ८२ व्या स्थानी आला आहे. याच क्रमवारीमध्ये भारत मागील वर्षी ७७ व्या स्थानी होती. लाचखोरीचा मागोवा घेणारी संघटना ट्रेसने याबाबतची क्रमवारी प्रसिद्ध केली आहे.Trace declares their report
या संघटनेने १९४ देशांत सर्वेक्षण केले होते. यंदा प्रसिद्ध झालेल्या क्रमवारीनुसार उत्तर कोरिया, तुर्कमेनिस्तान, व्हेनेझुएला आणि एरिट्रीया या देशांमध्ये व्यावसायिक लाचखोरीची जोखीम मोठी असून डेन्मार्क, नॉर्वे, फिनलंड, स्वीडन आणि न्यूझीलंडमध्ये ती तुलनेने कमी असल्याचे दिसून आले आहे.
या क्रमवारीमध्ये भारत २०२० साली ७७ व्या स्थानी होती. यंदा तो ४४ अंकांसह ८२ व्या स्थानी पोचल्याचे ताज्या आकडेवारीतून दिसून येते.पाकिस्तान, नेपाळ, चीन, बांगलादेश आणि भुतान या शेजारी देशांचा विचार केला तर भारताची कामगिरी अधिक सरस असल्याचे दिसून येते.
ज्या देशांमध्ये लोकशाही व्यवस्थेला अवकळा आली आहे अशा इजिप्त, व्हेनेझुएला, तुर्कस्तान, पोलंड आणि हंगेरी या देशांतील स्थिती अधिक बिकट आहे. अमेरिकेतील स्थितीही फारशी समाधानकारक नसल्याचेही यातून दिसून येते.
Trace declares their report
महत्त्वाच्या बातम्या
- मेंदूचा शोध व बोध : शिकत असताना शाळेत किंवा व्यवहार्य जगण्यात डाव्या मेंदूवरच अधिक भर
- लठ्ठपणाने ग्रासलेल्या लहान मुलांवर कोरोनाचे गंभीर परिणाम, नव्या अभ्यासात इशारा
- मनी मॅटर्स : मेहनत करून कमावलेले पैसे गरज नसताना उडवू नका
- टेस्लाचे एलन मस्क यांनी विकले तब्बल नऊ अब्ज डॉलर किमतीचे शेअर