• Download App
    तेलंगणात ५० कोटींची लाच देऊन रेवणनाथ रेड्डींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद मिळविल्याचा काँग्रेस सरचिटणीसाचाच आरोप। TPCC secy Kaushik Reddy sent his resignation letter to party president Sonia Gandhi. During a press conference, yesterday he alleged that Telangana Congress President A Revanth Reddy paid Rs 50 crore to AICC Telangana in-charge Manickam Tagore to get the post of TPCC President.

    तेलंगणात ५० कोटींची लाच देऊन रेवणनाथ रेड्डींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद मिळविल्याचा काँग्रेस सरचिटणीसाचाच आरोप

    वृत्तसंस्था

    हैदराबाद : इकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या काँग्रेस संघटनेत वरपासून खालपर्यंत संघटनात्मक बदल करण्याचा मनसूबा रचताहेत. तर दुसरीकडे काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेते एकमेकांवर लाचखोरीचा आरोप करत आहेत. TPCC secy Kaushik Reddy sent his resignation letter to party president Sonia Gandhi. During a press conference, yesterday he alleged that Telangana Congress President A Revanth Reddy paid Rs 50 crore to AICC Telangana in-charge Manickam Tagore to get the post of TPCC President.



    तेलंगणात ५० कोटी रूपयांची लाच देऊन रेवणनाथ रेड्डी यांनी प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्षपद मिळविलेय, असा आरोप दुसरा तिसऱ्या नव्हे, तर खुद्द पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसानेच जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेऊन केला आहे.

    तेलंगण प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस कौशिक रेड्डी यांनी हा आरोप करून आपल्या पदाचा राजीनामा सोनिया गांधी यांच्याकडे पाठविला आहे. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, की रेवणनाथ रेड्डी यांनी काँग्रेसचे तेलंगणा इनचार्ज मणिक्कम टागोर यांना ५० कोटी रूपयांची लाच दिली आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळवले.

    या आरोपांना मणिक्कम टागोर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केसीआर आणि टीआरएस यांना पराभूत करणे हे माझे ध्येय आहे. म्हणूनच जे काँग्रेसमध्ये राहून मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यावर निष्ठा ठेवतात, ते माझ्यावर असले आरोप करत आहेत. माझे वकील त्यांना बदनामीची नोटीस पाठवतील. मदुराई कोर्टात आम्ही केस रजिस्टर करू. वेलकम टू मदुराई कोर्ट असे ट्विट मणिक्कम टागोर यांनी केले आहे.

    तेलंगणात केसीआर यांच्या टीआरएसला दोन तृतीयांश बहुमत आहे. तेथे काँग्रेसची राजकीय अवस्था आधीच तोळामासा आहे आणि आता तर काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांमध्येच लाचखोरीचे आरोप – प्रत्यारोप होताहेत. प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचत आहे. सोनिया गांधी पक्ष संघटनेत बदल करू इच्छित असताना हे घडते आहे.

    TPCC secy Kaushik Reddy sent his resignation letter to party president Sonia Gandhi. During a press conference, yesterday he alleged that Telangana Congress President A Revanth Reddy paid Rs 50 crore to AICC Telangana in-charge Manickam Tagore to get the post of TPCC President.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य