वृत्तसंस्था
पाटणा : तब्बल चार महिन्याच्या खंडानंतर बिहारमध्ये मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. बिहारमध्ये राज्य सरकारने निर्बंध हळूहळू शिथिल देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्व दुकाने, हॉल, शॉपिंग मॉल, बाग, धार्मिक स्थळे सामान्य रूपाने सुरू झाली आहेत. Total unlock in Bihar, schools, temples opened
मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले की, राज्यातील परिस्थिती सुधारत असल्याने सर्व दुकाने, शॉपिंग मॉल, गार्डन आणि धार्मिक स्थळ खुले करण्यात येत आहेत. तत्पूर्वी बिहारमध्ये आतापर्यंत मिळालेल्या सवलतीचा विचार केल्यास दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. तसेच दुकाने आणि मॉलमध्ये काम करणाऱ्या लोकांना लस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
त्याबाबतची खातरजमा पोलिसांकडून केली जात आहे. तसेच ५० टक्के क्षमतेने चित्रपटगृहे, क्लब, हॉल, स्वीमिंग पूल, रेस्टॉरंट, हॉटेल सुरू करण्यात आली असून सर्व विद्यापीठ, शाळा, महाविद्यालयाबरोबरच कोचिंग क्लास सुरू करण्यात येणार आहत. बिहारमध्ये चार महिन्यानंतर मंदिरे भाविकांसाठी खुले करण्यात आले.
Total unlock in Bihar, schools, temples opened
महत्त्वाच्या बातम्या
- युनिटेकच्या मालकांना तिहारमधून मुंबईतील तुरुंगात हलवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
- छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांच्या खुर्चीला लागणार सुरुंग, काँग्रेसच्या सर्व आमदारांना दिल्लीत बोलावले
- योदी आदित्यनाथ सरकारने जाहीर केल्या शेतकऱ्यांसाठी अनेक सवलती, विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु
- जालियनवाला बागचा नवीन परिसर २८ ऑगस्ट रोजी राष्ट्राला समर्पित केला जाईल, पंतप्रधान मोदी उद्घाटन करतील