वृत्तसंस्था
टोकियो – भारताची पॅराऑलिंपिकमधली सुवर्णकन्या अवनी लेखरा हिने एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदके मिळविण्याचा पराक्रम केला आहे. भारतासाठी हा ऐतिहासिक दिवस ठरला आहे. कारण एकाच ऑलिपिंकमध्ये दोन पदके मिळविणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. 50m Rifle 3P SH1 मध्ये तिने ब्राँझ पदक पटकावले आहे. Tokyo Paralympics, R8 Women’s 50m Rifle 3P SH1: Avani Lekhara wins bronze medal
अवनीच्या या पराक्रमाचे देशातून कौतूक सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून तिचे खास अभिनंदन केले आहे. एकाच ऑलिपिंकमध्ये सलग दोन पदके पटकावून अवनी लेखरा हिने देशाची मान जगात उंचावली आहे. तिची ही अभूतपूर्व कामगिरी देश दीर्घकाळ लक्षात ठेवेल, असे अभिनंदनाचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
आजच दुसरा भारतीय खेळाडू प्रवीण कुमारने 2.07 मीटर उडी मारून रौप्य पदक क्रमांक पटकावले. पुरुषांच्या टी -64 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रौप्य पदक जिंकलेया सामन्यात नोएडाचा रहिवासी असलेल्या प्रवीणने ब्रिटनच्या ब्रूम एडवर्ड्स जोनाथनने 2.10 मीटर उडीसह सुवर्ण जिंकले. तर पोलंडच्या लेपियाटो मासिजोने 2.04 मीटर उडी घेऊन कांस्यपदक पटकावले.
प्रवीण कुमारच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवीण कुमार यांचे अभिनंदन केले आहे. टोकिया पॅरालिम्पिक प्रवीण कुमारने रौप्य पदक जिंकल्याचा देशाला अभिमान वाटतो. हे पदक त्याच्या कठोर परिश्रमाचे आणि सतत मेहनतीचे फळ आहे, त्याचे अभिनंदन. प्रवीणला भविष्यासाठी शुभेच्छा, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.
Tokyo Paralympics, R8 Women’s 50m Rifle 3P SH1: Avani Lekhara wins bronze medal
महत्त्वाच्या बातम्या
- जीडीपीनंतर जीएसटीचीही घौडदौड, सलग दुसऱ्यांदा जीएसटी महसूल एक लाख कोटींवर
- असेही महिला सक्षमीकरण, महिला सरपंचाकडे ११ कोटींची माया, एक एकराचा स्विमींग पूल असलेला बंगला
- पैसे केंद्रांचे आणि विज्ञान अविष्कार नगरीला राजीव गांधींचे नाव, रतन टाटा यांचे नाव देण्याची पिंपरी-चिंचवडकरांची मागणी
- राफेलचे लॅँडींग झाले पण राहूल गांधींचे टेक ऑफ होऊ शकले नाही, राफेलचा आनवश्यक मुद्दा उचलल्याचा परिणाम, राजनाथ सिंह यांची टीका