• Download App
    मरिअप्पन थंगावेलू आणि शरद कुमार यांचा दुहेरी धमाका, भारताच्या खात्यात रौप्य आणि कांस्यपदक । Tokyo paralympics 2020 mariyappan thangavelu and sharad kumar gives india medal in high jump

    Tokyo Paralympics : मरिअप्पन थंगावेलू आणि शरद कुमार यांचा दुहेरी धमाका, भारताच्या खात्यात रौप्य आणि कांस्यपदक

    Tokyo paralympics : टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत मरिअप्पन थंगावेलूने रौप्य आणि शरद कुमारने कांस्यपदक जिंकल्याने चाहत्यांना दुहेरी आनंदाची संधी मिळाली. उंच उडीच्या टी 63 स्पर्धेत दोघांनी पदके जिंकली. रिओ पॅरालिम्पिकनंतर थंगावेलूने सलग दुसरे पदक जिंकले आहे. रिओमध्ये कांस्य जिंकणारा वरुण सिंह भाटी यावेळी पदकापासून वंचित राहिला. Tokyo paralympics 2020 mariyappan thangavelu and sharad kumar gives india medal in high jump


    वृत्तसंस्था

    टोकियो : टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत मरिअप्पन थंगावेलूने रौप्य आणि शरद कुमारने कांस्यपदक जिंकल्याने चाहत्यांना दुहेरी आनंदाची संधी मिळाली. उंच उडीच्या टी 63 स्पर्धेत दोघांनी पदके जिंकली. रिओ पॅरालिम्पिकनंतर थंगावेलूने सलग दुसरे पदक जिंकले आहे. रिओमध्ये कांस्य जिंकणारा वरुण सिंह भाटी यावेळी पदकापासून वंचित राहिला.

    दोघांनीही पहिल्याच प्रयत्नात 1.73 मीटरची यशस्वी उडी मारली. यानंतर, 1.77 मीटरची उडीदेखील क्लिअर झाली. भारताचा शरद कुमार सुरुवातीपासूनच आघाडीवर होता. मात्र, त्याला 1.83 मीटरवर यशस्वीरीत्या उडी मारता आली नाही.

    यानंतर, फक्त मरिअप्पन आणि अमेरिकेचा ग्रीव्ह सॅम या शर्यतीत होते. दोघांनी 1.86 च्या मीटरवर यशस्वी उडी मारली. यानंतर मरिअप्पन तीन प्रयत्नांतही 1.86 मीटरची उडी क्लिअर करू शकला नाही. दुसरीकडे, अमेरिकेच्या ग्रीव्हने तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी उडी घेऊन सुवर्णपदक जिंकले.

    Tokyo paralympics 2020 mariyappan thangavelu and sharad kumar gives india medal in high jump

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य