भारताजवळ धनुर्विद्या आणि शूटिंगमध्ये पदक जिंकण्याची संधी असेल.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताचा आजचा नववा दिवस आहे. शुक्रवारचा दिवस देशासाठी पदकाची भेट घेऊन आला. शुक्रवारी भारताचे दुसरे पदक निश्चित झाले . आज कमलप्रीत कौरने अॅथलेटिक्स (डिस्कस थ्रो)- आपल्या शेवटच्या अटेंप्ट मध्ये 64.00 मीटर की लांबीचा थ्रो केला. या थ्रो मुळे तिला पुढं जायला संधी मिळाली. Tokyo Olympics: Boxer Amit Panghal out after Atanu Das; Kamalpreet Kaur in the final; Kamalpreet Kaur reached the final.
तर दुसरीकडे भारतीय तिरंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली आहे. शेवटच्या पदकाची आशा असलेला अतनू दासही उपांत्यपूर्व फेरीचा सामना गमावला आहे. या सामन्यात अतनू दासचा जपानच्या ताकाहारू फुरुकावाकडून 4-6 च्या फरकाने पराभव झाला आहे.
बॉक्सिंगमध्ये भारताला निराशा मिळाली आहे. अमित पंघाल 16 व्या शर्यतीत बाहेर पडला आहे. अमित पंघालने पहिल्या फेरीत विजय मिळवला होता. मात्र तो दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत मागे पडला. अमित पंघालकडून भारताला पदकाच्या मोठ्या आशा होत्या. अमित पंघालचा टोकियो ऑलिम्पिकमधील प्रवास संपला आहे.
Tokyo Olympics : Boxer Amit Panghal out after Atanu Das; Kamalpreet Kaur in the final; Kamalpreet Kaur reached the final.