• Download App
    Tokyo Olympics : भारताला गोल्फमध्ये गोल्ड मिळण्याची आशा, असे झाल्यास अदिती अशोक करणार सुवर्णपदकाची कमाई । Tokyo olympics 2020 golf aditi ashok in contention for medal

    Tokyo Olympics : भारताला गोल्फमध्ये गोल्ड मिळण्याची आशा, असे झाल्यास अदिती अशोक करणार सुवर्णपदकाची कमाई

    Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी एक पदक येऊ शकते. स्टार गोल्फर अदिती अशोकने तिच्या कामगिरीने पदकाच्या आशा वाढवल्या आहेत. महिलांच्या वैयक्तिक स्ट्रोक खेळाच्या तिसऱ्या फेरीनंतर अदिती दुसऱ्या स्थानावर आहे. Tokyo olympics 2020 golf aditi ashok in contention for medal


    वृत्तसंस्था

    टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी एक पदक येऊ शकते. स्टार गोल्फर अदिती अशोकने तिच्या कामगिरीने पदकाच्या आशा वाढवल्या आहेत. महिलांच्या वैयक्तिक स्ट्रोक खेळाच्या तिसऱ्या फेरीनंतर अदिती दुसऱ्या स्थानावर आहे.

    अदितीला सुवर्णपदक जिंकण्याची मोठी संधी आहे. खराब हवामानामुळे शनिवारी (7 ऑगस्ट) चौथी आणि अंतिम फेरी झाली नाही, तर अदितीला रौप्य पदक मिळू शकते. त्याचवेळी जर अंतिम फेरी पूर्ण झाली, तर ती सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असेल. 23 वर्षीय अदिती अशोक बंगळुरूची रहिवासी आहे.

    जर अदितीने पदक जिंकले, तर तो भारतीय गोल्फसाठी ऐतिहासिक क्षण असेल. ऑलिम्पिकमध्ये भारताने अद्याप गोल्फमध्ये पदक जिंकलेले नाही. पाच वर्षांपूर्वीपर्यंत अदिती अशोक तिचा वेळ गोल्फच्या दिग्गजांमध्ये घालवत होती. रिओ ऑलिम्पिक 2016 मधील महिला गोल्फ स्पर्धेत ती सर्वात तरुण स्पर्धक होती. आता काळ बदलला आहे आणि ती टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या मार्गावर आहे.

    अदिती म्हणाली, ‘रिओ ऑलिम्पिकमध्ये भाग घेतल्याने मला अनुभव मिळाला. ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये राहणे आणि खेळाडूंना पाहणे हा एक अद्भुत अनुभव होता. या ऑलिम्पिकमध्ये मला वाटते की, मी चांगला फिनिश करेन. मी पदक जिंकण्याचा प्रयत्न करेन.”

    Tokyo olympics 2020 golf aditi ashok in contention for medal

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    India Russia : भारतीय वस्तू 40 ऐवजी 24 दिवसांत रशियात पोहोचतील; मोदी-पुतिन यांच्या करारामुळे 6000 किमीची बचत

    SIR Process : SIR प्रक्रिया-तामिळनाडूत 84 लाख मतदारांचे अर्ज जमा नाहीत; नाव वगळले जाऊ शकते, 11 डिसेंबर अंतिम तारीख

    महाराष्ट्रात टाचणी पडली, तरी तिचा आवाज विधिमंडळात पोहोचतो; हीच संविधानाची ताकद!!