Corona Updates In India : देशभरात कोरोना महामारीमुळे रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली आहे. दररोज वाढणारी रुग्णसंख्या धडकी भरवणारी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,49,691 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी कोरोनामुळे 2,767 जण मरण पावले आहेत. गेल्या 24 तासांत 2,17,113 जण बरे होऊ घरीही गेले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. यानंतर उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि दिल्लीचा नंबर लागतो. नवीन रुग्णसंख्येत या पाच राज्यांचा वाटा 53 टक्के आहे. Todays Corona Updates In India, more than 3.49 lakh patients registered in 24 hours, 2767 deaths
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशभरात कोरोना महामारीमुळे रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली आहे. दररोज वाढणारी रुग्णसंख्या धडकी भरवणारी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,49,691 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी कोरोनामुळे 2,767 जण मरण पावले आहेत. गेल्या 24 तासांत 2,17,113 जण बरे होऊ घरीही गेले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. यानंतर उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि दिल्लीचा नंबर लागतो. नवीन रुग्णसंख्येत या पाच राज्यांचा वाटा 53 टक्के आहे.
यापूर्वी शनिवारी देशात कोरोनाचे नवीन 3,46,786 नवे रुग्ण आढळले होते, तर 2624 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या कालावधीत 2,19,838 रुग्णही बरे झाले. याआधी शुक्रवारी देशात कोरोनाचे 3.32 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले होते.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची आकडेवारी
मागील 24 तासांत आढळलेले रुग्ण – 3,49,691
गेल्या 24 तासांतील मृत्यू – 2,767
आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या – 1,69,60,172
आतापर्यंत एकूण बरे झालेले – 1,40,85,110
आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू – 1,92,311
सध्याची एकूण सक्रिय रुग्णसंख्या – 26,82,751
आतापर्यंत झालेले एकूण लसीकरण – 14,09,16,417
संसर्ग वाढीबरोबरच अनेक राज्यांमध्ये बेड, ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरसारख्या अत्यावश्यक औषधांची कमतरतादेखील दिसून येत आहे. अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन आणि निर्बंध लादलेले असूनही अद्याप संसर्ग नियंत्रित झालेला नाही. राजधानी दिल्लीत सहा दिवसांच्या लॉकडाउननंतर आता आणखी आठवडाभर ते वाढवण्याची चर्चा आहे. महाराष्ट्रात आधीच लॉकडाऊन लादलेले आहे.
महाराष्ट्रात कोरोनामुळे 676 मृत्यू
शनिवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 67,160 नवीन रुग्ण आढळले. या व्यतिरिक्त 676 मृत्यूची नोंददेखील झाली. महाराष्ट्रात कोरोनातील मृत्यूचे प्रमाण 1.51 टक्के आहे. सध्या महाराष्ट्रात 41,87,675 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 29,246 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात सक्रिय प्रकरणांची रुग्णांचीसंख्या 6,94,480 आहे.
Todays Corona Updates In India, more than 3.49 lakh patients registered in 24 hours, 2767 deaths
महत्त्वाच्या बातम्या
- AIIMS च्या उभारणीत मोदी सरकार सर्वात पुढे, घोषणा केलेल्या १४ पैकी ११ एम्स कार्यरत, मनमोहन सरकारने उभारले फक्त एक
- रेल्वेतर्फे 5600 आयसोलेशन कोच ; कोरोना रुग्णांवर उपचार, क्वारंटाईनसाठी वापर
- रोगप्रतिकार शक्तीत महिला अव्वल, मुंबईतील सर्वेक्षण; उंच इमारतीतील रहिवासीही सुरक्षित
- मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता; सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटही
- ममतांचा निवडणूक आयोगावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा, भाजप म्हटले पराभवाच्या भीतीने अस्वस्थता वाढलीय