• Download App
    आज 2022 मधले अखेरचे चंद्रग्रहण; या आहेत वेळा Today is the last lunar eclipse of 2022; Here are the times

    आज 2022 मधले अखेरचे चंद्रग्रहण; या आहेत वेळा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : आज 8.11.2022 रोजी या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. सूर्यग्रहणाच्या 15 दिवसानंतर म्हणजे देव दिवाळीनंतर हे चंद्रग्रहण लागणार आहे. 2022 या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण 16 मे 2022 रोजी झाले होते. आणि आज वर्षातले हे शेवटचे अंतिम पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे. Today is the last lunar eclipse of 2022; Here are the times

    केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या माहितीनुसार, 8 नोव्हेंबर रोजी ग्रहण IST दुपारी 2.39 वाजता सुरू होईल, एकूण ग्रहण IST दुपारी 3.46 वाजता सुरू होईल. संपूर्णत: जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत असेल तेव्हा ग्रहणाचा टप्पा IST संध्याकाळी 05.11 वाजता संपेल आणि ग्रहणाचा आंशिक टप्पा IST संध्याकाळी 6.19 वाजता खंडग्रास ग्रहण समाप्त तर 07.26 वाजता छायाकल्प चंद्रग्रहण समाप्त होईल.

    ‘या’ देशांतसुद्धा दिसणार चंद्रग्रहण :

    आज दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण हे भारताबरोबरच इतरही देशांत दिसणार आहे. यामध्ये आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर-दक्षिण अमेरिका, या शहरांचा समावेश आहे. तसेच, पूर्वेत्तर भारताचे टोक असलेल्या अरुणाचल प्रदेशात चंद्र उगविताना खग्रास स्थिती असेल. मात्र, चंद्र क्षितिजावर असल्याने पाहता येणार नाही. उर्वरित देशात सर्वत्र हे ग्रहण खंडग्रास दिसेल.

    भारताबाहेर आज भारतीय वेळेनुसार पारी 01.32 वाजता छायाकल्प चंद्रग्रहणाला सुरुवात होईल. 02.39 वाजता खंडग्रास ग्रहणाला सुरुवात होईल. 03.46 वाजता खग्रास ग्रहणाला सुरुवात होईल. तर, 05.11 मिनिटाने खग्रास ग्रहण समाप्त होईल. 06.19 वाजता खंडग्रास ग्रहण समाप्त तर 07.26 वाजता छायाकल्प चंद्रग्रहण समाप्त होईल.

    Today is the last lunar eclipse of 2022; Here are the times

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Jagdeep Dhankhar उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा; वैद्यकीय कारणास्तव पदत्याग

    Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर सरकारने म्हटले- घाईत निष्कर्ष नको; अंतिम तपास अहवालाची प्रतीक्षा करा

    CM Yogi : सीएम योगी म्हणाले- कावडियांच्या वेशात बदमाश लपलेत, त्यांचा पर्दाफाश करू