• Download App
    पृथ्वीजवळून आज जाणार बुर्ज खलीपा एवढ्या आकाराचा लघुग्रह ; नासाच्या शास्त्रज्ञाची नजर। Today Burj khalifa Shaped asteroid will pass near from earth; NASA's eyes on asteroid

    पृथ्वीजवळून आज जाणार बुर्ज खलीपा एवढ्या आकाराचा लघुग्रह ; नासाच्या शास्त्रज्ञाची नजर

    वृत्तसंस्था

    वॅशिंग्टन : पृथ्वीजवळून आज बुर्ज खलीपा एवढ्या आकाराचा लघुग्रह जाणार आहे. तो त्याची कक्षा बदलून पृथ्वीवर आदळणार नाही ना ? याच्या धास्तीने नासाच्या शास्त्रज्ञाची नजर त्याच्यावर राहणार आहे. Today Burj khalifa Shaped asteroid will pass near from earth; NASA’s eyes on asteroid

    आपल्या सूर्यमालेत गुरु आणि शुक्र ग्रहाच्या पट्ट्यात अनेक खडकाचे तुकडे अर्थात लघुग्रह फिरत असतात. त्या पैकी एक किंवा सुदूर अंतराळातून आलेले लहान मोठे लघुग्रह पृथ्वीजवळून आतापर्यत अनेकदा गेले आहेत. अर्थात हा खगोलीय परिणाम आहे. अनेक ग्रह हे पृथ्वीच्या अगदी जवळून जात असतात. त्यापैकीच हा लघुग्रह असून त्याचे नामकरण १९९४ पिसी १ , असे केले आहे. तो दुबईतील बुर्ज खलीपा इमारतीच्या आकाराचा आहे. एक किलोमीटर उंचीचा आहे. तो पृथ्वीपासून १२ लाख ३० हजार मैलावरून जाणार आहे. हे अंतर पूर्वी गेलेल्या लघुग्रहांचा विचार करता फारच कमी असून त्याने कक्षा बदलली तर तो पृथ्वीसाठी धोकादायक बनू शकतो, असा धोक्याचा इशारा नासाने दिला आहे.



    यापूर्वी पृथ्वीवर लघुग्रह आदळून जुरासिक एजमध्ये महाकाय प्राणी असलेल्या डायनसोर्स यांचा अंत झाला होता. तसेच महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर सुद्धा उल्काघातामुळे निर्माण झाले होते. अशा अनेक घटना इतिहासात घडल्या आहेत. अर्थात त्या अमुक एका ठिकाणी घडल्या होत्या म्हणजे पुन्हा त्या तेथेच घडणार आहेत, असे नाही. वरील दोन्ही घटना या पूर्वी झालेल्या घटनांची उदाहरणे मात्र आहेत.

    Today Burj khalifa Shaped asteroid will pass near from earth; NASA’s eyes on asteroid

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!