वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : एलन मस्क यांची ‘स्पेसएक्स’ कंपनी आज नवा इतिहास रचणार आहे. कंपनीतर्फे अंतराळवीर नाही तर सामान्य नागरिकांना अंतराळात पाठविण्यात येणार आहे. Today, a new history will be made in the field of space missions, spaceX will fly in space with four
सहभागी सदस्यांची नावे अशी जेअर्ड इसॅकमॅन, हेली अर्केनो, शॉन प्रॉक्टर, ख्रिस सेम्ब्रोस्क. या मोहिमेद्वारे अंतराळ पर्यटनास यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. यातून चार जणांना अंतराळाची सैर करण्याची संधी मिळणार आहे. फ्लोरिडाच्या केनडी स्पेस रिसर्च सेंटर येथून स्पेसएक्सचे यान चौघांना घेऊन अवकाशात भरारी मारेल. उड्डाणाची वेळ कंपनीने निश्चिरत केलेली नाही. हवामानाचा अंदाज घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
या मोहिमेला ‘इन्स्पिरेशन -४’ असे नाव देण्यात आले आहे. अब्जाधीश जेअर्ड इसॅकमॅन (वय ३८) हे या मोहिमेचा सर्व खर्च करणार आहेत.
यासाठी इसॅकमॅन यांनी स्वतःचा पैसा पुरविला आहे. तसेच देणगीही गोळा केली आहे. अमेरिकेतील टेनसीमधील सेंट चिल्ड्रेन रिसर्च हॉस्पिटलसाठी निधी गोळा करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट मोहिमेतून २० कोटी डॉलर एवढा निधी जमविण्याचे इसॅकमॅन याचे स्वप्न आहे.
यातील निम्मी रक्कम ते रुग्णालयाला देणार आहेत. कर्करोगाबद्दल जागृती करणे हाही एक हेतू यामागे आहे. या मोहिमेतील सदस्य यापूर्वी कधीही अंतराळात गेलेले नाहीत.
Today, a new history will be made in the field of space missions, spaceX will fly in space with four
महत्त्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जी यांचा कॉँग्रेसच्या खासदारांवरच भरवसा, वैतागून अॅडव्होकेट जनरलने दिला राजीनामा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीतअल्पसंख्यांक शंभर टक्के सुरक्षित, द्वेषाच्या घटना वाढल्याचा आरोप चुकीचा, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंह लालपुरा यांचा निर्वाळा
- महामार्गावरील सुसाट वेगाला आवर, वेग मर्यादा १२० किलोमीटरपर्यंत वाढविण्याच्या केंद्राच्या सूचनेला मद्रास उच्च न्यायालयाची स्थगिती
- भवानीपूरमध्ये सोला अना मशीदीचा आशिर्वाद घेऊन ममता बॅनर्जी यांची प्रचाराला सुरूवात, भाजपने केला घाम फुटल्याचा आरोप