- बार्टीमार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना संघ लोकसेवा आयोग – नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा 2020 साठी आर्थिक सहाय्य योजना.
विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी 2020 साठी पात्र ठरले आहेत, अशा उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी रक्कम 25 हजार रुपये आर्थिक सहाय्य बार्टीमार्फत दिले जाईल.To candidates preparing for UPSC interview; ‘Barty’ to provide financial support: Read more
उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी आणि अनुसूचित जातीचा असावा. उमेदवार लोकसेवा आयोग नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा-2020 करिता पात्र असावा.
योजनेचे स्वरूप:-
पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी रक्कम रु. 25,000/- आर्थिक सहाय्य बार्टी मार्फत दिले जाईल.
पात्रता :-
1. उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.
2. उमेदवार संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा-2020 करिता पात्र असावा.
अर्ज करण्यासाठी-
1.बार्टीच्या संकेतस्थळावरील फॉर्म भरावा.
2.अर्जासोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, DAF, उमेदवारांचे बँक खाते क्र. (पासबुकच्या प्रथम पृष्ठाची प्रत) व त्यासोबत संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 चे प्रवेश पत्र (Admit Card) इ. च्या स्व-साक्षांकित प्रती अपलोड कराव्यात. कागदपत्र स्व-साक्षांकित असणे बंधनकारक आहे.
3.फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक- अर्ज भरण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल 2021 आहे. पात्र उमेदवारांनी अधिक माहिती साठी 020- 26343600 किंवा 26333339 या क्रमांकावर संपर्क साधावा.
फॉर्म करण्यासाठी लिंक- http://barti.maharashtra.gov.in> NOTICE BOARD> BARTI-UPSC-Civil Services Personality Test 2020 Online Application Form
“बार्टीमार्फत पात्र विद्यार्थ्यांसाठी मॉक इंटरव्यू घेतला जाईल. याबाबत सविस्तर सूचना ई-मेल द्वारे कळविण्यात येईल,” अशी माहिती बार्टीमार्फत देण्यात आली.
To candidates preparing for UPSC interview; ‘Barty’ to provide financial support: Read more