• Download App
    भाजप नेत्यांच्या तृणमूलमध्ये प्रवेशासाठी कार्यालयाबाहेर रांगा, बॅनर्जी यांचा टोला। TMC targets BJP

    भाजप नेत्यांच्या तृणमूलमध्ये प्रवेशासाठी कार्यालयाबाहेर रांगा, बॅनर्जी यांचा टोला

    वृत्तसंस्था

    कोलकता : पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते हे तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी कार्यालयाबाहेर रांग लावत असल्याचा दावा सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी केला आहे. TMC targets BJP

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी म्हणाले, की राज्यातील भाजप नेते आणि त्यातही आमदार असणारे हे तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यालयाबाहेर रांग लावत आहेत. परंतु दरवाजा बंद आहे. जर दरवाजा उघडला तर नक्कीच भाजप कोलमडून पडेल. ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीत राज्याबाहेरच्या लोकांना पिटाळून लावले होते.



    आगामी निवडणुकीतही असेच घडणार आहे. त्रिपुरातील भाजप सरकारने निवडणूक प्रचारसभा रोखण्यासाठी जमावबंदीचा कायदा लागू केला आहे. यावर बोलताना बॅनर्जी म्हणाले, की त्रिपुरात किती दिवस निर्बंध लागू ठेवाल. येत्या विधानसभेला तृणमूलचा नक्कीच विजय होईल. येत्या तीन महिन्यांत तृणमूलचे यश लोकांना पाहावयास मिळेल, असा दावाही त्यांनी केला. त्रिपुरात पुढील वर्षाच्या प्रारंभी विधानसभा निवडणूक होत आहे.

    TMC targets BJP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    IPL matches : 16 मेपासून IPL सुरू होण्याची शक्यता; उर्वरित 16 सामने तीन शहरांमध्ये होऊ शकतात

    Pakistan High Commission : पंजाबमध्ये दोन पाकिस्तानी हेरांना अटक; दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयात लष्कराची माहिती पाठवत होते, ऑनलाइन पेमेंट घेत होते

    Hamas support : पुण्यात हमास समर्थनाचे पोस्ट वाटणाऱ्या तरुणांना जमावाची मारहाण; परिसरात तणावाचे वातावरण; VIDEO व्हायरल