विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : म्हैसूरचा वाघ म्हणून ओळखला जाणाऱ्या टिपू सुलतानाने मंदिरांची उभारणी केल्याचे सांगितले जाते. पण मलाबारामध्ये हिंदूवर अत्याचार करणाऱ्या , पालाघाट किल्यात हजारो ब्राम्हणांची कत्तल करणाऱ्या टिपू सुलताने मंदिरे का बांधली तर म्हैसूरमध्ये हिंदूबहुल असल्याने त्याला तेथे राज्य करायचे होते.Tipu Sultan’s cunning, atrocities on Hindus in Malabar, thousands of Brahmins killed in Palghat fort but temples built in Mysore
वस्त्रोद्योग मंत्री असलम शेख यांनी आमदार निधीतून आपल्या परिसरात एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले आहे. यालाच ते टिपू सुलतान यांचे नाव देणार आहेत.यावरून बजरंग दल आणि भाजप संतप्त आहेत. मोठ्या संख्येने हिंदूंच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तीचे नाव आम्ही मैदानाला देऊ देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
इतिहासात सांगण्यात आले आहे की टिपू सुलतान यांनी 1783 मध्ये पालघाट किल्ल्यावर हल्ला करून हजारो ब्राह्मणांची कत्तल केली होती. त्यामुळे, हिंदूंच्या मनात टिपू सुलतानविषयी भीती निर्माण झाली होती.
टिपू सुलतान यांच्यावर पुस्तक लिहिणारे चिदानंद मूर्ती यांनी सांगितले, ‘टिपू एक चाणाक्ष शासक होते. त्यांनी म्हैसूरमध्ये हिंदूंवर अत्याचार केलेले नाहीत.
परंतु, तटवर्ती भाग मालाबारमध्ये त्यांनी हिंदूंवर अत्याचार केले होते. संघाचे विचारवंत आणि राज्यसभा खासदार राकेश सिन्हा यांनी मुलाखतीत म्हटले होते की, टिपू सुलतान यांनी हिंदूंचे धर्मांतर करण्यासोबतच मोठ्या प्रमाणात हिंदूंची हत्या केली होती.
त्यांनी अनेक मंदिरे तोडली आणि हिंदू स्त्रियांची इज्जत लुटली. त्यामुळे संघ आणि भाजप टिपू सुलतान यांना विरोध करतात. त्याचवेळी निवडणुकीपूर्वी टिपू सुलतान यांचा मुद्दा उपस्थित केला जात असताना प्रत्येक पक्ष हा मुद्दा स्वत:च्या फायद्यासाठी उचलतो का?
Tipu Sultan’s cunning, atrocities on Hindus in Malabar, thousands of Brahmins killed in Palghat fort but temples built in Mysore
महत्त्वाच्या बातम्या
- एकाच पक्षाला कोर्टातून दिलासा कसा मिळतो? भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द झाल्यावर संजय राऊत यांचा सवाल
- ADR Report : भाजपने 2019-20 मध्ये 4847 कोटींची संपत्ती जाहीर केली, इतर राजकीय पक्षांची काय आहे स्थिती? वाचा सविस्तर…
- दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक, ९ महिलांसह ११ आरोपी, दिल्ली पोलिसांची माहिती
- UP Election : भाजपची 91 उमेदवारांची यादी जाहीर, मुख्यमंत्री योगींचे माध्यम सल्लागार शलभमणी यांना देवरियातून तिकीट