• Download App
    Tipu Sultan supporters clashed against Savarkar at Shivamogga in Karnataka

    कर्नाटकात शिवमोग्गात सावरकर विरुद्ध टिपू सुलतान समर्थक भिडले; कलम 144 लागू!!

    वृत्तसंस्था

    बंगळुरू : कर्नाटकातील शिवमोग्गा शहरात सोमवारी दोन गटात हाणामारी झाली. अमीर अहमद सर्कलमध्ये हिंदू संघटनेच्या लोकांनी वीर सावरकरांचे पोस्टर लावले होते. यानंतर टीपू सुलतानच्या समर्थकांनी याचा निषेध केला आणि झेंडा घेऊन पोहोचले. त्यांनी देखील यावेळी टिपू सुलतानचे पोस्टर लावण्याचा प्रयत्न केला. हा वाद थांबवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर सावरकरांचे चित्रही काढण्यात आले. Tipu Sultan supporters clashed against Savarkar at Shivamogga in Karnataka

    तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शिवमोग्गा शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवमोग्गाच्या डीएमने मंगळवारी शहर आणि भद्रावती शहराच्या हद्दीतील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दोन्ही ठिकाणी 18 ऑगस्टपर्यंत कलम 144 लागू राहणार असल्याचे डीएम म्हणाले. शिवमोग्गा येथील अमीर अहमद सर्कलमध्ये टिपू सुलतानचा बॅनर लावण्यासाठी एका गटाने सावरकरांचा बॅनर काढण्याचा प्रयत्न केला.

    एका व्यक्तीला भोसळले

    शिवमोग्गा येथील गांधी बाजार परिसरातही एका व्यक्तीवर चाकूचा वार करण्यात आला, मात्र या प्रकरणी चाकूहल्ला झाला की अन्य कोणत्या कारणावरून झाला, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

    भाजप आणि इतर हिंदू संघटनांनी या प्रकरणाचा निषेध केला. त्यांना सावरकरांचे पोस्टर लावण्याची परवानगी द्यावी आणि सावरकरांचा अवमान केल्याप्रकरणी अन्य गटावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. अशाच आणखी एका प्रकरणात, पोलिसांनी मंगळुरूमधील सुरतकल चौकाला सावरकरांचे नाव देणारे पोस्टरही हटवले आहे.

    जूनमध्ये भाजप नेत्याची हत्या

    कर्नाटकातील शिवमोग्गा येथे 23 जून रोजी भाजप नेते मोहम्मद अन्वर यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. मारेकरी दुचाकीवरून आले होते. मोहम्मद अन्वर हे भाजपचे सरचिटणीस होते. भाजप खासदार शोभा करंदलाजे यांनी या हत्येमागे कट्टरवाद्यांचा हात असल्याचे सांगितले होते.

    Tipu Sultan supporters clashed against Savarkar at Shivamogga in Karnataka

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य