• Download App
    कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट फेब्रुवारीत उच्चांकी पातळीवर पोचणार । Thrird wave of corona will on peak in Feb

    कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट फेब्रुवारीत उच्चांकी पातळीवर पोचणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशातील कोरोना प्रसाराचे प्रमाण दर्शविणारा ‘आर-नॉट व्हॅल्यू’ या आठवड्यामध्ये चार टक्क्यांवर पोचले असून यावरून हा संसर्ग खूप वेगाने पसरत असल्याचे दिसून येते असे संशोधकांनी म्हटले आहे. कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट ही १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान उच्चांकी पातळीवर पोचण्याची शक्यता आयआयटी मद्रासने व्यक्त केली आहे.

    देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना संसर्गाची तिसरी लाट पसरू लागली असून याला ओमिक्रॉन या व्हेरिएंटचाच प्रसार कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. सुरूवातीला पश्चिमेकडील राज्यांमध्ये कोरोना वेगाने पसरत होता पण आता ईशान्येकडील काही राज्ये, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांमध्ये संसर्ग वाढला आहे.



    सध्या सर्वच भागांमध्ये ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. देशभर कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्यासाठी ओमिक्रॉन हा व्हेरिएंटच कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. दरम्यान आग्नेय आशियायी देशांमधील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर निर्बंध आणि आरोग्यविषयक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेने मांडले आहे.

    Thrird wave of corona will on peak in Feb

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bihar : बिहार विधानसभा निवडणूक रालोआत जागावाटपावरून रस्सीखेच, 15 जागा नसल्यास लढणार नाही-जितन राम, मी रागावलो असे म्हणणे चुकीचेच- चिराग

    Nobel Prize : जपान, अमेरिका-ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल; नवीन अणू डिझाइन विकसित

    बिहारमध्ये परस्पर “तेजस्वी सरकारची” घोषणा; पण काँग्रेसच्या बरोबर महागठबंधनचा अद्याप ना आता, ना पता!!