• Download App
    राकेश टिकैत यांच्यावर काळी शाई फेकली; टिकैत यांचा भाजप सरकारवर आरोप!!Threw black ink on Rakesh Tikait; Tikait accuses BJP government !!

    राकेश टिकैत यांच्यावर काळी शाई फेकली; टिकैत यांचा भाजप सरकारवर आरोप!!

    वृत्तसंस्था

    बेंगलुरू : भारतीय किसान युनियनचे नेते राकेश यांच्यावर कर्नाटकची राजधानी बंगलोर मधील एका कार्यक्रमात काळी शाई फेकण्यात आली आहे. स्थानिक शेतकरी नेते के. चंद्रशेखर यांच्या समर्थकांनी ही शाई फेकल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र राकेश टीकाही त्यांनी आपल्या कार्यक्रमाला कर्नाटक पोलिसांनी जाणून-बुजून सुरक्षा पुरवली नाही म्हणून हा प्रकार घडला, असा आरोप केला आहे. शाई फेकण्या प्रकरणी बंगलोर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. Threw black ink on Rakesh Tikait; Tikait accuses BJP government !!

    कृषी कायदे केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर तसेच त्यानंतर खुद्द राकेश टिकैत यांच्या भारतीय किसान युनियन मध्ये फूट पडल्यानंतर प्रथमच राकेश टिकैत हे दक्षिणेतील राज्याच्या मोहीमेवर आले होते.



     

    बंगलोर मधील एका सभागृहात त्यांचे कार्यक्रम सुरू असताना के. चंद्रशेखर यांचे समर्थक तिथे जमले होते. राकेश टिकैत यांना के. चंद्रशेखर यांच्या शेतकरी आंदोलनाला बाबत आपल्याला काय वाटते?, असे विचारले असता आपला त्या आंदोलनाशी काही संबंध नाही, असे उत्तर त्यांनी दिले. त्यानंतर चंद्रशेखर समर्थकांनी यांच्यावर काळी शाई फेकली आहे. मात्र, भाजपा सरकारने आपल्या कार्यक्रमाला पुरेशी सुरक्षा व्यवस्था दिली नाही म्हणून हा प्रकार घडला, असा आरोप त्यांनी केला आहे.

    Threw black ink on Rakesh Tikait; Tikait accuses BJP government !!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan earthquake : भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानात आधीच रेडिएशनची भीती, त्यात दोन दिवसांनंतर आज तिसऱ्या भूकंपाचा धक्का!!

    Rajnath Singh : राजनाथ म्हणाले- रावळपिंडीपर्यंत ब्राह्मोसचा आवाज गेला; ते आपल्या सैन्याच्या ताकदीचे प्रतीक

    Operation Sindoor मधून भारताचा नूर खान + किराणा हिल्स मधल्या अण्वस्त्रांना धक्का, पाकिस्तानात रेडिएशनचा धोका, अमेरिकेसकट चीनला हादरा!!