विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : जम्मू-काश्मी रमधील सोपोर येथे रात्री उशीरा झालेल्या चकमकीत लष्करे तैयबाचा कमांडर मुदासीर पंडीत याच्यासह तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले. काश्मीार खोऱ्यात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत तीन पोलिस, दोन नेते व दोन सामान्य नागरिक मारले होते. या दहशतवादी कारवायांमध्ये पंडित सहभागी होता. Three terrorist died in encounter
कालच्या चकमकीत मारला गेलेला असरार ऊर्फ अब्दु ल्लात हा दुसरा दहशतवादी पाकिस्तानी आहे, असे सांगण्यात आले. तो काश्मीारमध्ये २०१८ पासून सक्रिय होता. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर, केंद्रीय राखीव पोलिस दल आणि जम्मू-काश्मीदर पोलिस यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबविली. पोलिस व सुरक्षा दलांची सोपोरमधील कामगिरी महत्त्वपूर्ण मानली जाते. उत्तर काश्मीरमध्ये १२ जून रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी अनेक शोध मोहिमा सुरू केल्या होत्या.
Three terrorist died in encounter
महत्त्वाच्या बातम्या
- म्यानमारमधील संघर्षांचा लाखो नागरिकांना फटका, लाखो जण देश सोडण्याच्या तयारीत
- राज्यात म्युकरमायकोसिस रूग्णसंख्या पोचली सात हजारांवर; ७२९ रूग्ण आजपर्यंत दगावले
- पवारांनी आजची बैठक सर्वपक्षीय नव्हे; समाजवादी, बसप, वायएसआर काँग्रेस, तेलुगु देशम हे पक्ष त्यात नाहीत; संजय राऊतांनी काढली बैठकीची हवा
- करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने ब्रिटनची उडाली झोप
- मुलीचे शाळेत अॅडमिशन नाही, बापाने ई-मेलद्वारे दिली चक्क मंत्रालय बॉम्बने उडविण्याची धमकी