blast during oxygen refilling in Lucknow : वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे देशात आधीच ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचे सांगितले जात आहे. अशातच ऑक्सिजन प्लांटही 24 तास रिफिलिंग करत आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये ऑक्सिजन भरताना मोठी दुर्घटना झाली आहे. लखनऊच्या चिनहाट येथील केटी प्लांटमध्ये रिफिलिंगदरम्यान सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू, तर पाच जण जखमी झाले आहेत. three killed and five critical in a blast during oxygen refilling in Lucknow
वृत्तसंस्था
लखनऊ : वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे देशात आधीच ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचे सांगितले जात आहे. अशातच ऑक्सिजन प्लांटही 24 तास रिफिलिंग करत आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये ऑक्सिजन भरताना मोठी दुर्घटना झाली आहे. लखनऊच्या चिनहाट येथील केटी प्लांटमध्ये रिफिलिंगदरम्यान सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू, तर पाच जण जखमी झाले आहेत.
स्फोटानंतर जागेवरच दोघांचा मृत्यू झाला होता, तर एका व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला. सीएम योगी यांनी दुर्घटनेची दखल घेतली असून अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. अनेक अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आहे.
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे प्लांटवर रुग्णांचे नातेवाइक आणि पुरवठादारांची लांबच लांब रांग लागलेली दिसत आहेत. चोवीस तास गॅस रिफिलिंगमुळे ऑक्सिजन प्लांटवरही मोठा ताण आला आहे. दरम्यान, चिन्हाट येथील केटी ऑक्सिजन प्लांटमध्ये मोठी दुर्घटना झाली. ऑक्सिजन रिफिलिंगदरम्यान सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट होताच घटनास्थळी एकच धावपळ सुरू झाली होती.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेची दखल घेत मृतांबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहचून मदत व बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. दुर्घटनेमागचे कारण शोधण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
three killed and five critical in a blast during oxygen refilling in Lucknow
महत्त्वाच्या बातम्या
- Maratha Reservation : मराठा आरक्षणावर आता राज्याने व केंद्राने मिळून मार्ग काढावा, खा. संभाजीराजेंचे आजी व माजी मुख्यमंत्र्यांना पत्र
- Maratha Reservation : का रद्द झाले मराठा आरक्षण? फडणवीसांनी सांगितली राज्य सरकारची करणी; म्हणाले- पुढेही सहकार्यच करू
- Maratha Reservation : मराठा आरक्षण रद्द झाल्यावर आता पुढे पर्याय कोणते? वाचा सविस्तर
- Maratha Reservation : “राज्य सरकारनं नियोजित पद्धतीनं मराठा आरक्षणाचा खून केला”, नितेश राणेंची ठाकरे सरकारवर घणाघाती टीका
- Maratha Reservation : आरक्षण फेटाळले हे लढवय्या समाजाचे दुर्दैवच, सर्वोच्च निकालानंतर मुख्यमंत्री ठाकरेंची प्रतिक्रिया