वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये राजकीय घमासान थांबायला तयार नाही. उलट ते अधिकच उफाळून येताना दिसत आहे. माजी परराष्ट्र मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नटवर सिंग यांनी काँग्रेसमधल्या सध्याच्या बंडाळी साठी थेट राहुल गांधी यांना जबाबदार धरले आहे.Three, including Rahul Gandhi, are responsible for the current insurgency in the Congress; The horns rained down on Nat
नटवर सिंग यांच्या रूपाने जी 23 वगळून कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यानंतरचे दुसरे नेते उघडपणे राहुल गांधींच्या नेतृत्वात विरोधात समोर आले आहेत.सध्या काँग्रेसची अवस्था अजिबात चांगली नाही. पक्षातल्या बंडाळीला जर कोणी जबाबदार असतील तर ते तिघे जबाबदार आहेत.
त्यापैकी एक राहुल गांधी आहेत. राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची सध्या कोणतीही जबाबदारी नाही. ते फक्त खासदार आहेत. पण पक्ष आपल्याच जबाबदारीवर आणि नेतृत्वाखाली चालतो असे ते वागत आहेत, अशी टीका नटवर सिंग यांनी केली आहे.
नटवर सिंग यांच्या मुखातून काँग्रेस मधली अस्वस्थता बाहेर पडली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेते एकापाठोपाठ एक गांधी परिवारावर राजकीय प्रहार करत आहेत. काल कपिल सिब्बल यांनी उघडपणे भर पत्रकार परिषदेत गांधी परिवारावर टीका केली. गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीची मागणी केली तर आज नटवर सिंग यांनी थेट राहुल गांधी यांना जबाबदार धरून परिवारावर टिकास्त्र सोडले.
कॅप्टन अमरिंदरसिंग यांना पंजाबच्या मुख्यमंत्री पदावरून बाजूला केल्यानंतरच्या या घडामोडी आहेत. पक्षातले सर्व वरिष्ठ नेते एकापाठोपाठ एक उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. पण राहुल गांधी त्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. ते सध्या केरळच्या दौऱ्यावर आहेत.
गोव्यात माजी मुख्यमंत्री लुईजिनो फालेरो यांनी काँग्रेस पक्ष सोडून तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे आणि कॅप्टन अमरिंदरसिंग हे भाजपमध्ये जाणार नसले तरी ते काँग्रेसमध्ये राहणार नाहीत, असे त्यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांची दिशा देखील तृणमूल काँग्रेसच्या किंवा स्वतंत्र पक्ष उभा करण्याच्या दिशेने सुरू असल्याचे मानण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर नटवर सिंग यांनी थेट राहुल गांधी यांना सध्याच्या बंडाळी साठी जबाबदार धरून आपला मार्गही “मोकळा” असल्याचे सूचित केले आहे. काल कपिल सिब्बल यांनी गांधी परिवारावर टीका केल्यानंतर त्यांच्या विरोधात गांधी समर्थकांनी निदर्शने केली. आता नटवर सिंग यांनी थेट राहुल गांधी यांचे नाव घेऊन टीकास्त्र सोडल्याने गांधी समर्थक नेमके काय करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Three, including Rahul Gandhi, are responsible for the current insurgency in the Congress; The horns rained down on Nat
महत्त्वाच्या बातम्या
- Bhawanipur Bypoll : भाजप नेत्याच्या कारवर हल्ला, तृणमूलवर तोडफोडीचे आरोप, बनावट मतदारांवरून गोंधळ, EC ने मागवला अहवाल
- Farmers Protest : शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे, म्हणाले – ‘महामार्ग कायमचे रोखू शकत नाहीत!’, केंद्राला निर्देश
- Amarinder Singh : कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेस सोडणार, पण भाजपमध्ये आताच प्रवेश नाही, काँग्रेस घसरणीला लागल्याची टीका
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जेल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात आमची लढाई , भुजबळ यांना पालकमंत्री पदावरून हटवा, शिवसेना आमदार सुहास कांदे यांची मागणी