• Download App
    राष्ट्रकुलमध्ये भारताला तीन सुवर्ण :19 वर्षीय जेरेमी आणि 20 वर्षीय अचिंताने भारताला मिळवून दिले सुवर्णपदक|Three golds for India in Commonwealth Games 19-year-old Jeremy and 20-year-old Achinta bagged gold for India

    राष्ट्रकुलमध्ये भारताला तीन सुवर्ण :19 वर्षीय जेरेमी आणि 20 वर्षीय अचिंताने भारताला मिळवून दिले सुवर्णपदक

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी भारतीय वेटलिफ्टर्सने वर्चस्व कायम राखले. दिवसभरात तीन वेटलिफ्टिंग स्पर्धा झाल्या आणि दोनमध्ये भारताने सुवर्ण पदक जिंकले. या सुवर्ण कामगिरीसह भारताला 6 पदके मिळाली आहेत. विशेष म्‍हणजे ही सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत. पदकतालिकेत भारत आता पाचव्या स्थानावर आहे.Three golds for India in Commonwealth Games 19-year-old Jeremy and 20-year-old Achinta bagged gold for India

    जेरेमी लालरिनुंगाने रविवारी पहिल्या पुरुषांच्या 67 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण यश संपादन केले. त्‍यानंतर रात्री उशिरा अचिंता शिऊलीने 73 किलो वजनी गटात देशाला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले.



    अचिंताची नेत्रदीपक कामगिरी

    अचिंता शिऊलीने स्नॅच फेरीत अव्वल स्थान पटकावले. त्याने पहिल्या प्रयत्नात 137 किलो, दुसऱ्या प्रयत्नात 140 किलो आणि तिसऱ्या प्रयत्नात 143 किलो वजन उचलले.

    यानंतर क्लीन अँड जर्क फेरीत अचिंताने पहिल्याच प्रयत्नात 166 किलो वजन उचलले. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 170 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र तो उचलू शकला नाही. त्याने तिसऱ्या प्रयत्नात पुन्हा 170 किलो वजन उचलले.

    Three golds for India in Commonwealth Games 19-year-old Jeremy and 20-year-old Achinta bagged gold for India

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य