प्रतिनिधी
मुंबई : 25 कोटींच्या खंडणी प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांची सध्या सीबीआय चौकशी होत आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणात त्यांची चौकशी होतेय. समीर वानखेडेंची सीबीआयने परवा तब्बल 5 तास चौकशी केली. त्यानंतर कालही त्यांची चौकशी झाली. सीबीआयच्या 2 दिवसांच्या तपासानंतर समीर वानखेडे यांच्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.Threats to Sameer Wankhede from underworld social media; Demand for protection from the police
मात्र या आधी समीर वानखेडे यांना स्वतःच्या सुरक्षेचे चिंता वाटत असून त्यांना अंडरवर्ल्डकडून वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट वर धमक्या येत असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. तसेच त्यांनी मुंबई पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी हल्ल्याची भीती व्यक्त केली आहे.
समीर वानखेडे मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून विशेष सुरक्षेची मागणी करणार आहेत. मला सुरक्षा द्या अन्यथा माझ्यावर अतिक अहमदप्रमाणे मीडियाच्या रूपाने माझ्यावर हल्ला होऊ शकतो, असेही ते म्हणाले.
माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. जे काही कायदेशीर आहे. ते मी न्यायालयात सांगणार आहे. सीबीआयला त्यांची बाजू मांडू द्या. आम्ही सीबीआयला शुभेच्छा देतो, असंही वानखेडे म्हणालेत.
सुरक्षेचा प्रश्न माझ्यासमोर आहे. मी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे सुरक्षेची मागणी करणार आहे. पोलिसांना असंही सांगण्यात आलं आहे. सोशल मीडिया, इन्स्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडियावर सतत धमक्या येत आहेत. या सर्व विषयांवर मी मुंबई पोलीस आयुक्तांशी एकत्रित चर्चा करणार आहे, असंही वानखेडे म्हणालेत.
मी सीबीआयच्या तपासात सहकार्य करत असल्याचे समीर वानखेडे यांनी सांगितलं. माझा सीबीआय आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, मला न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
समीर वानखेडे यांनी आर्यन खानची शाहरुख खानकडे जेलमधून सुटका करण्यासाठी तब्बल 25 कोटींची खंडणी मागितली, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्यासह इतर 5 जणांवर सीबीआयनं गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाची सध्या चौकशी होत आहे. आज या प्रकरणी सुनावणी होत आहे.
Threats to Sameer Wankhede from underworld social media; Demand for protection from the police
महत्वाच्या बातम्या
- James Marape Profile : कोण आहेत PM जेम्स मारापे? ज्यांनी PM मोदींना चरणस्पर्श केला, मोदींसाठी बदलली स्वागताची परंपरा
- शहीद जवानांवर लढल्या होत्या 2019 च्या निवडणुका, चौकशी झाली असती तर राजीनामा द्यावा लागला असता, सत्यपाल मलिक यांचा केंद्रावर पुन्हा हल्लाबोल
- पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान म्हणाले- भारत आमचा नेता, मोदी म्हणाले – आम्ही कोरोनामध्ये मदत केली, ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी साथ दिली नाही
- आजपासून काश्मीरमध्ये G20ची बैठक, भारताने म्हटला- पृथ्वीवरील स्वर्ग कसा आहे हे टूरिझम वर्किंग ग्रपला दिसेल, चीनचा बहिष्कार