• Download App
    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी|Threat to kill Chief Minister Yogi Adityanath

    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरवर लेडी डॉन नामक अकाउंटवर ही धमकी देण्यात आली आहे. संबंधित अकाउंटविरोधात हापूर जिल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Threat to kill Chief Minister Yogi Adityanath

    संबंधित ट्विटर अकाउंट सध्या सस्पेंड करण्यात आले असून पुढील कारवाई केली जात आहे. लेडी डॉन नावाचं ट्विटर हँडल नेमकं कोणाचं आहे? याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला जात आहे. धमकीच्या ट्विटमध्ये लिहिलं की, ‘ओवैसी तर एक मोहरा आहे. खरं टार्गेट योगी आदित्यनाथ आहेत.



    सर्व भाजप नेत्यांच्या वाहनांवर आरडीएक्सने हल्ला केला जाणार आहे. अज्ञात आरोपीनं संबंधित ट्विटमध्ये यूपी पोलिसांना देखील टॅग केलं असून तुमची टीम तयार ठेवा, असा सल्ला दिला आहे. तुम्ही दिल्लीकडे फारसं लक्ष देऊ नका, अन्यथा इकडे योगी मारला जाईल.’ अशी धमकी लेडी डॉन नावाच्या ट्विटर अकाउंटवरून देण्यात आली आहे.

    Threat to kill Chief Minister Yogi Adityanath

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र