अयोध्या : अयोध्येत राममंदिराची उभारणी व्हावी यासाठी आंदोलन करणाºया रामभक्तांवर ज्यांनी पूर्वी गोळ्या चालविल्या तेच आता येथे दर्शनासाठी येत आहे, असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लगावला आहे. अयोध्या ही भारताची सांस्कृतिक राजधानी बनत असल्याचेही त्यांनी सांगितले.Those who used to shoot at Ram devotees are now coming to Ayodhya for darshan, says Yogi Adityanath
अयोध्या भेटीच्या वेळी योगी आदित्यनाथ म्हणाले, अयोध्येमध्ये भव्य राममंदिराची उभारणी होत आहे ही जनतेची खरी ताकद आहे. आता जगातील कोणतीही शक्ती मंदिर उभारण्यापासून आपल्याला रोखू शकणार नाही.
समाजवादी पक्षावर हल्लाबोल करताना योगी आदित्यनाथ म्हणाले, यापूर्वी विकासकामांचा निधी कब्रस्थानातील भिंती बनविण्यासाठी खर्च केला जायचा. मात्र, आमच्या सरकारच्या काळात अयोध्येच्या विकासासाठी वापरला जात आहे. दोन सरकारच्या विचारधारांमधील हाच फरक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोनासारख्या भयंकर रोगाशी आपण लढत आहोत. या काळात गरीबांची पूर्णपणे काळजी घेतली गेली. उत्तर प्रदेशातील १५ कोटी गरीबांना पंतप्रधान योजनेद्वारे अन्नधान्याचे वितरण केले जात आहे. या योजनेतील सुरू असलेले अन्नधान्याचे वितरण होळीपर्यंत सुरू ठेवले जाणार आहे. याचबरोबर अंत्योदय कार्डधारकांना अन्नधान्यासोबत डाळ, मिठ, तेल आणि साखर यांचेही वाटप केले जाईल.
Those who used to shoot at Ram devotees are now coming to Ayodhya for darshan, says Yogi Adityanath
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान