• Download App
    ईडी संचालकांना सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ नाकारल्यानंतर लिबरल्सना आनंद; पण आनंदाचा फुगा अमित शाहांनी फोडला!! Those rejoicing over the Hon'ble SC decision on the ED case

    ईडी संचालकांना सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ नाकारल्यानंतर लिबरल्सना आनंद; पण आनंदाचा फुगा अमित शाहांनी फोडला!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांना केंद्र सरकारने दिलेली मुदतवाढ सुप्रीम कोर्टाने नाकारली. हा केंद्र सरकारचा पराभव असल्याचे मानत काँग्रेस सह लिबरल्सनी फार मोठा आनंद व्यक्त केला. काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारवर या निमित्ताने प्रश्नचिन्ह लावले. ईडी, सीबीआय सारख्या तपास संस्था मोदी सरकारने स्वतःच्या कब्जात घेतल्या पण सुप्रीम कोर्टाने त्यांना चपराक हाणली, असे काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले. काँग्रेसचे संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी देखील केंद्र सरकारला त्याच मुद्द्यावरून धारेवर धरले. Those rejoicing over the Hon’ble SC decision on the ED case

    पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस आणि लिबरल्सचा आनंदाचा फुगा फोडून टाकला. अमित शाहांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर एक प्रदीर्घ ट्विट करून वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. ईडी सारख्या केंद्रीय तपास संस्थेचे संचालक कोणीही असले तरी मूळ भूमिका बदलणार नाही आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईतून सुटका मिळणार नाही, असे अमित शाहांनी या ट्विटमध्ये स्पष्ट केले.

    – अमित शाहा यांनी केलेले ट्विट असे :

    – ईडी प्रकरणावर माननीय SC ने दिलेल्या निर्णयावर आनंद व्यक्त करणारे विविध कारणांमुळे भ्रमित आहेत :

    – संसदेने रीतसर मंजूर केलेल्या CVC कायद्यातील सुधारणा कायम ठेवण्यात आल्या आहेत. भ्रष्ट आणि कायद्याच्या चुकीच्या बाजूने असलेल्यांवर कारवाई करण्याचे ईडीचे अधिकार कायम आहेत.

    – ED ही एक संस्था आहे, जी कोणत्याही एका व्यक्तीच्या पलीकडे जाते आणि तिचे मुख्य उद्दिष्ट साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करते – म्हणजे मनी लॉन्ड्रिंग आणि परकीय चलन कायद्यांचे उल्लंघन या गुन्ह्यांची चौकशी करणे.

    अशा प्रकारे, ईडीचे संचालक कोण आहेत – हे महत्त्वाचे नाही. कारण जो कोणी ही भूमिका स्वीकारेल तो विकासविरोधी मानसिकता असलेल्या हक्कदार घराणेशाहीच्या आरामदायक क्लबच्या सर्रास भ्रष्टाचाराची दखल घेईल.

    अमित शहा यांनी एवढे सविस्तर ट्विट करून काँग्रेस सह विविध पक्षांच्या भ्रष्टाचारी नेत्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. केंद्र सरकारची भ्रष्टाचारा विरोधातील मोहीम थांबणार नाही. कोणी कितीही बडे असतील तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत, असेच अमित शाह यांनी या ट्विटमधून स्पष्ट केले आहे.

    Those rejoicing over the Hon’ble SC decision on the ED case

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य