विशेष प्रतिनिधी
दिल्ली : दिवाळी म्हटले की शॉपिंग आलीच. घरातील प्रत्येक जण बऱ्याच वस्तूंची शॉपिंग करत असतो. घरातील पूजेपासून लागणारे सामान, सजावटीचे सामान ते फटाक्यांपर्यंत बरीच मोठी शॉपिंगची लिस्ट दिवाळीमध्ये सर्वांचीच बनलेली असते.
This year’s Diwali is beneficial for traders! This year the purchase broke the record
कोरोनामुळे बऱ्याच व्यावसायिकांचे व्यवसाय डबघाईला आलेले होते. पण यंदाच्या दिवाळीने या सर्वांना उभारी दिल्यासारखं दिसत आहे. यंदाच्या दिवाळीत झालेल्या खरेदीने व्यापाऱ्यांची मागील 10 वर्षांतील विक्रम मोडले आहेत.
Diwali 2021 : जम्मूतील नौशेरामध्ये पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी, जवानांसोबत साजरी करणार दिवाळी
व्यापारी संघटना द कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने दिलेल्या आकडेवारीनुसार यंदाच्या दिवाळीत आत्तापर्यंत 1.25 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झालेला आहे.
या प्रतिसादामुळे भविष्यातही बाजारात चांगली मागणी होऊन बाजारपेठ सुरळीत होईल अशी अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. यामुळे अर्थचक्र पुन्हा सुरळीत होण्यास मदतच झाली आहे. या आधीचा विक्रम 1 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय करण्याचा होता पण हा विक्रम यावर्षी मोडण्यात आला आहे.
तर आता इथून पुढे न्यू इयर आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर वर्षाअखेर तीन लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होईल असे व्यापारी संघटनेच्या अंदाजानुसार माहिती मिळत आहे.
This year’s Diwali is beneficial for traders! This year the purchase broke the record
महत्त्वाच्या बातम्या
- किरीट सोमय्यांच्या रडारवर महाविकास आघाडीतील आणखी तीन मंत्री; घोटाळे काढणार बाहेर!!
- केजरीवाल सरकारने दिल्लीतील जनतेला दिली भेट, मोफत रेशन योजना सहा महिन्यांसाठी वाढवली
- अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; विशेष न्यायालयाचे आदेश
- अमेरिका : संगीत महोत्सवात भीषण अपघात, किमान आठ जणांचा मृत्यू
- हसन मुश्रीफ निघाले अहमदनगरच्या दिशेने ; मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना सरकारी मदत दिली जाणार